जिल्ह्यात ईद उत्साहात

By Admin | Updated: September 26, 2015 00:39 IST2015-09-26T00:39:39+5:302015-09-26T00:39:39+5:30

तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, जव्हार, तलासरी भागात शुक्रवारी बकरी ईद पारंपारीक पद्घतीने उत्साहात साजरी झाली.

Eid excitement in the district | जिल्ह्यात ईद उत्साहात

जिल्ह्यात ईद उत्साहात

डहाणू : तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, जव्हार, तलासरी भागात शुक्रवारी बकरी ईद पारंपारीक पद्घतीने उत्साहात साजरी झाली. सकाळचा नमाज अदा केल्यानंतर मुस्लीमबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्साहात अनेक ठिकाणी हिंदुबांधवही सहभागी झाले होते.
डहाणूतील चिंचणी, तारापुर, बोईसर, डहाणू, सावटा, वानगांव, कासा, चारोटी, इ. गावात तसेच परिसरात शुक्रवारी हिंदु-मुस्लीम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. दिवसभरात मात्र कुठेही अनुचित प्रकार घडल्याची पोलीसांत नोंद नाही.
माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, अप्पर पोलीस अधिक्षक बी. जी. यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड (बोईसर), सचिन पांडकर (डहाणू) पोलीस निरिक्षक, अरुण फेगडे (वानगांव), उत्तम सोनावणे (डहाणू), जी. डब्लू बांगर (घोलवड), डी. शेलार (तारापुर), रविकांत मगर (कासा), डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहिर शाह,
युवा नेते करण ठाकूर, प्रसाद वझे, आशिस बारी, इ. कार्यकर्ते, पुढारी तसेच राजकीय नेतेमंडळींनी मशिदीजवळ उभे राहून हजारो मुस्लीम बांधवांना पुष्प देवून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी चिंचणी तसेच डहाणूच्या समुद्रावर हजारो मुस्लीमबांधवांनी शुभेच्छा दिल्या. रात्री अनेक ठिकाणी शैक्षणिक, सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: Eid excitement in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.