उल्हासनगरात शैक्षणिक साहित्य घोटाळा

By Admin | Updated: August 18, 2015 23:12 IST2015-08-18T23:12:46+5:302015-08-18T23:12:46+5:30

महापालिकेने ७ हजार विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून दप्तर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि वह्या हा

Educational literature scam in Ulhasnagar | उल्हासनगरात शैक्षणिक साहित्य घोटाळा

उल्हासनगरात शैक्षणिक साहित्य घोटाळा

उल्हासनगर : महापालिकेने ७ हजार विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून दप्तर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि वह्या हा साहित्य संच १९५० रूपयाला दाखविण्यात आला आहे. बाजारात या साहित्यसंचाची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त नसल्याची टीका होत असून शैक्षणिक साहित्याची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. एकाच वेळी ७ हजार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले असून यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकही आठवड्यातून दोन दिवस गणवेशात दिसणार असून त्यांना चिक्कीच्या लेखा-जोख्याची जबाबदारी देण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाच्या २८ शाळांतील ७ हजार विद्यार्थी दोन महिने शैक्षणिक साहित्यापासून वंचित होते. पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त जमीर लेंगरकर यांच्या प्रयत्नातून दोन महिने उशिराने का होईना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षी तर दिवाळीनंतर शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्याने सर्व स्तरातून टीका झाली होती. मुलांची शाळेतील १०० टक्के उपस्थिती हेच उद्दिष्ट असून शिक्षकही आठवड्यातून दोन दिवस शालेय गणवेशात दिसणार आहे. शिक्षकांना पांढरा शर्ट आणि काळी पँट तर शिक्षिकांना गुलावी रंगाचा पंजाबी ड्रेस देणार असल्याचेही लेंगरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Educational literature scam in Ulhasnagar