शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नायगाव रेल्वेस्थानकातील पूर्वेकडील मुख्य रस्ता बंद; नागरिकांचे झाले हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 8:12 AM

करावी लागली पायपीट : शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून रस्ता खुला

पारोळ : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांना लोकल प्रवासाला परवानगी नाही. त्यामुळे नायगाव रेल्वेस्थानकातील केवळ मुख्य रस्ताच सुरू होता. या रस्त्याचा वापर नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी करतात. तसेच, पूर्वेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकात येण्यासाठीही हाच रस्ता आहे. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीपासून हा रस्ता आणि तिकीट खिडकी रेल्वे प्रशासनाने बंद केली. त्यामुळे प्रवाशांसोबतच पूर्व-पश्चिम येजा करणा:या नागरिकांचे प्रचंड  हाल झाले. 

पूर्वेकडील मुख्य रस्ताच बंद केल्यामुळे प्रवाशांना नायगाव सबवेतून मार्ग काढून नायगाव स्थानकाला वळसा घालून स्थानकाच्या पश्चिमेला तिकीट काढायला जावे लागले. याचा महिलांना सर्वाधिक त्रस सहन करावा लागला. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त करून शिवसेनेकडे तक्रार करताच पूर्वेतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करून प्रशासनाला हा रस्ता पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले. 

मंगळवारी मध्यरात्री अचानक रेल्वे सुरक्षा बल विभागाकडून नायगाव स्थानकाच्या पूर्वेतील मुख्य रस्ता आणि तिकीट खिडकी बंद केल्याने पूर्वेकडील नागरिकांना स्थानकाच्या पश्चिमेकडे येताना स्थानकाला वळसा घालून यावे लागले. मुख्य रस्ता बंद केल्याने स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर येण्यासाठी प्रवाशांना पायपीट करावी लागली. या गोंधळात अनेकांची लोकल चुकल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनकाळात सहा महिन्यांपासून इतर प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाही. मात्र, सर्वसामान्यांसाठी येजा करण्यासाठी लॉकडाऊनमध्येही सुरू असलेला पूर्वेकडील मुख्य रस्ताच बंद केल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रस सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या प्रवाशांनी  नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या आंदोलनानंतर  प्रशासनाने रस्ता खुला केला.

नायगाव पूव्रेकडील स्थानकात फलाट क्रमांक ४ वर जाण्याचा मुख्य रस्ता हा आम्ही बंद केलेला नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तो बंद करण्यात आला होता. - संतोषकुमार, इन्चार्ज, वसई रेल्वे सुरक्षा बल