शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:25 IST

तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला.

तलासरी : तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. अनेक जणांनी घराबाहेर धाव घेतली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची कारणमीमांसा शोधण्यास मात्र सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.मंगळवारी सकाळी बसलेला धक्का जोरदार होता. त्याची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. मात्र, धक्क्यांची तीव्रता बघता झालेल्या नोंदीबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. भूकंपाच्या या जोरदार धक्क्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.नियमति बसणाऱ्या या धक्क्यांनी लोकांच्या मनात स्थलांतराचा विचार डोकावतो आहे. पण उपाय योजना करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते आहे. घरे, शाळा, अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत. या धोकादायक घरात राहणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे.सरकारी यंत्रणेकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे, तडे गेलेल्या घरांना अवघे सहा हजार रुपये दिले जातात. हे म्हणजे आपत्तीग्रस्त लोकांच्य जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शाळा, अंगणवाड्यांना महसूल कडून तंबूसाठी पुरविलेल्या ताडपत्र्या अडगळीत पडून वा गायब झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर