तार्इंच्या संपामुळे उपासमार, गरोदर मातांना अंगणवाडीतून दिला जाणारा आहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:21 IST2017-09-21T03:21:31+5:302017-09-21T03:21:35+5:30
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हा शंभर टक्के ग्रामीण आदिवासी भाग आहे. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी बालविकास विभागाकडून नेहमीच पुढे येत आहे.

तार्इंच्या संपामुळे उपासमार, गरोदर मातांना अंगणवाडीतून दिला जाणारा आहार बंद
हुसेन मेनन
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हा शंभर टक्के ग्रामीण आदिवासी भाग आहे. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी बालविकास विभागाकडून नेहमीच पुढे येत आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून शासन सर्वेतोपरी प्रयत्न करतांना दिसत आहे. मात्र, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे कुपोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार, तालुक्यातील कुपोषणाचे प्रणाम वाढण्याचे चिन्ह आहे. याचा मोठा फटका कुपोषित बालके व गरोदर मातांना बसलेला आहे. तसेच गरोदर मातांना अंगणवाडीतून रोज दिला जाणारा आहार बंद झाल्याने कुपोषणाचे प्रणाम वाढणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
हे प्रमाण कमी व्हावे, म्हणून शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, कुपोषित बालकांना व गरोदर मातांना आहार दिला जात आहे. परंतु अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने कुपोषित बालकांचा व गरोदर मातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढी संपामुळे याचा मोठा फटका कुपोषित बालकांना व गरोदर महिलांना बसणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्यामुळे कुपोषित बालके व गरोदर मातांना आहाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंगणवाडी बंद असल्यामुळे कुपोषित बालकांची होणारी तपासणी होणार नाही. त्यांना रोज दिला जाणारा आहार मिळणार नाही. तसेच बालक अतितीव्र कुपोषित असेल त्या बालकाला अंगणवाडी सेविका रु ग्णालयात तात्काळ दाखल करून उपचार केले जातात. मात्र, अंगणवाडी सेविकाच बेमुदत संपावर गेल्यामुळे कुपोषित बालकांचा व गरोदर मातांचे या काळात कुपोषण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्याता असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
>१५१ अंगणवाड्या १२,२५५ कुपोषित
जव्हार बालविकास प्रकल्प-१ मध्ये अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या असा एकुण १५१ अंगणवाड्या आहेत. तसेच साखरशेत बालविकास प्रकल्प-२ मध्ये अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या असा एकूण- १९१ अंगणवाड्या आहेत. असा तालुक्यातील २४२ अंगणवाड्या असून, सर्वसाधारण कुपोषित बालके ७ हजार १०७ आहेत. तर मध्यम कुपोषित बालके ५ हजार ११८ अशी एकूण-१२ हजार २२५ कुपोषित बालके आहेत.