वसई : मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असावे या संशयातून वडिलांनीच १६ वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची घटना विरारमध्ये घडली. यात ती सत्तर टक्के भाजली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्या वडिलांनाविरार पोलिसांनी अटक केली आहे.मुलगी सतत फोनवर बोलते, म्हणजे तिचे प्रेमप्रकरण सुरू असावे, या संशयातून मोहम्मद याने आपली सोळा वर्षांची मुलगी शाहिस्ता मूर्तीजा मन्सुरी हिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ३१ डिसेंबरला विरार पूर्व येथील गोपचरपाडा येथे दुपारी दोन वाजता ही घटना घडली.सोमवारी दुपारी शाहिस्ता मोबाइलवर कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहून मोहम्मद यालाराग आला. त्याने तिच्या हातातील मोबाइल हिसकावून तो जमिनीवर आपटून फोडून टाकला. त्यानंतर घरातील रॉकेलचा भरलेला डबा मुलीच्या अंगावर ओतला वतिला, ‘तू कट जा, तू जल जा’ म्हणत पेटवून दिले. यात मुलगी जवळपास सत्तर टक्के भाजली असून, तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत आरोपी वडील मोहम्मद याला विरार पोलिसांनी अटक केली.
प्रेमप्रकरणाच्या संशयातून वडिलांनी मुलीला पेटवले, विरारमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:01 IST