वसई - ऐन दिवाळीत वसईतील महामार्गावरील दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत एक पुठ्ठ्याची आणि एक रसायनांची कंपनी जळून भस्मसात झाली. या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये अनेक औदयोगिक कंपन्या आहेत. बुधवाारी दुपारी बाराच्या सुमारास पुठ्ठा कंपनीला अचानक आग लागली. त्यापाठोपाठ त्याच्या शेजारी असलेल्या रसायनाच्या कंपनीने पेट घेतला. याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन शमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याच्या पाच बंबासह घटनास्थळी दाखल झाले. औषधांच्या कंपन्यांमध्ये रसायन असल्याने आग विजविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. मात्र, तरीही अवघ्या दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाल यश आले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. कंपन्यांमधील असलेले भंगार , औषधे, पुठ्ठे , रब्बर, प्लास्टिक आदी वस्तू जळून खाक झाल्या.
फटाक्यांमुळे वसईतील दोन कंपन्यांना भीषण आग, दोन्ही कंपन्या भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 18:08 IST