शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

सारथ्य तिच्या हाती... परिस्थितीला न डगमगता टॅक्सी चालवून उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:08 IST

जीवनाच्या प्रवासात दु:ख, निराशेचे अडथळे येणारच. पण म्हणून थांबून चालत नाही. उलट अशावेळी घाबरून न जाता कष्ट, जिद्द, आत्मविश्वासाचे स्टेअरिंग हाती धरले तरच पुढील मार्गक्रमण सोपे होते. याच सकारात्मक विचारातून येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करत कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी संगीता वंजारे यांनी टॅक्सीचे स्टेअरिंग हाती धरले आणि मुंबईतील पहिल्या महिला टॅक्सी चालक अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

- सागर नेवरेकरसंगीता वंजारे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातला. आई-वडील आणि पाच बहिणी. वडील बीएमसीत कामाला होते. सर्वकाही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच काळाने घाला घातला. वडिलांचे अकाली निधन झाले. हलाखीचे दिवस आले. मात्र, आईसह पाच बहिणी न डगमगता परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. मिळेल ते काम करू लागल्या. दरम्यानच्या काळात आईला बीएमसीत नोकरी मिळाली आणि परिस्थिती काहीशी सुसह्य झाली. या सर्व व्यापात संगीता यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांचे लग्न झाले.

सासरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण पैक्षांपेक्षाही मनाने, विचाराने श्रीमंत असलेले सासर त्यांना मिळाले. त्या नोकरी करू लागल्या. एकदा नवºयाशी बोलताना सहज गाडी चालविण्याचा विषय निघाला. गाडी चालविणे कठीण नाही यावर चर्चा झाली. यातूनच पहिली टॅक्सी कोण चालवायला शिकणार, अशी पैज लागली. गंमत म्हणून लागलेली ही पैजच पुढे सर्वसामान्य गृहिणी असलेल्या संगीता यांना मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक होण्याचा बहुमान देणारी ठरली.

सासू, खासगी कंपनीत सुरक्षारक्षक असलेले पती, आई, वरळी नाका-करी रोड शेअर टॅक्सी चालक-मालक संघटना या सर्वांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्यानेच लोअर परळ ते वरळी नाका या मार्गावरील महिला टॅक्सी चालक म्हणून माझा प्रवास सुखरूप सुरू आहे, असे संगीता यांनी सांगितले.

टॅक्सी चालविणे सोपे नाही. कधी कडाक्याचे ऊन तर कधी प्रचंड पाऊस. त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगांमध्ये होणारा खोळंबा. अशावेळी जेवण, नैसर्गिक विधी सर्वांचीच पंचाईत. शिवाय डोकं शांत ठेवून, कुठल्याही शॉर्टकटच्या मोहाला बळी न पडता टॅक्सी चालवावी लागते. जराजरी नजर विचलित झाली, स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले की अपघात ठरलेलाच. मात्र, संगीता संयमाने टॅक्सी चालवतात.ठरवले तर स्त्री कुठल्याही क्षेत्रात यशस्वीपणे सारथ्य करू शकते. गरज असते ती केवळ स्वत:मधील आत्मविश्वास जागवण्याची. एकदा का तो जागा झाला की मग अवघड असे काहीच नसते. पण हो, या वाटेवरून पुढे जायचे असेल तर आत्मविश्वासासोबतच प्रामाणिक कष्टांचीही तयारी हवी. अतिआत्मविश्वास, अहंकार आपल्या जवळपासही फिरकणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

टॅग्स :Lokmatलोकमत