शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सेवानिवृत्ताच्या खात्यावर डल्ला, अज्ञानाचा उचलला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:18 IST

बँक आॅफ इंडिया सातपाटी शाखेतील मनोज वजे या शिपायाने खारेकुरण येथील एका अशिक्षित वृद्ध ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या सेवानिवृत्तीची दोन लाखांची रक्कम परस्पर बँकेतून काढली. यावर तक्रार करुनही बँक प्रशासन आणि पोलीस कारवाई करीत नसल्याने आपल्या पुढे आत्महत्ये शिवाय मार्गच उरला नसल्याचे त्या वृद्धाने लोकमत ला सांगितले.

- हितेन नाईकपालघर - बँक आॅफ इंडिया सातपाटी शाखेतील मनोज वजे या शिपायाने खारेकुरण येथील एका अशिक्षित वृद्ध ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या सेवानिवृत्तीची दोन लाखांची रक्कम परस्पर बँकेतून काढली. यावर तक्रार करुनही बँक प्रशासन आणि पोलीस कारवाई करीत नसल्याने आपल्या पुढे आत्महत्ये शिवाय मार्गच उरला नसल्याचे त्या वृद्धाने लोकमत ला सांगितले.खारेकुरण मच्छीमार मध्यवर्ती संघाच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले शांताराम सुकºया नाईक रा. वाघोबा पाडा (खारेकुरण) हे मे २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्याच्या सेवानिवृत्ती नंतर मिळालेल्या रक्कमे पैकी २ लाख ९ हजार ४६८ रुपये इतकी रक्कम बँक आॅफ इंडिया सातपाटी शाखेत जमा झाली होती. ह्यातील २० हजार रु पयांची गरज असल्याने शांताराम नाईक ह्यांनी आपल्या गावातील ओळखीचे असलेले व बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मनोज वजे ह्यांच्या कडे विड्रॉल चेक स्लिप वर सही करून दिली. समोरील व्यक्ती अशिक्षित व एकटेच रहात असल्याचा फायदा उचलीत वजे ह्यांनी २० हजारा ऐवजी २ लाख रु पयांची रक्कम काढून घेतली. बºयाच कालावधी नंतर हा प्रकार लक्षात आल्या नंतर नाईक ह्यांनी आपले पैसे मिळण्याचा तगादा लावल्या नंतर तुमचे पैसे मी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली असल्याचे सांगून त्या वृद्धाला ३ हजार प्रति महिना असे ६ हजार रुपये दिले.आपल्या घरातून नेहमीच गायब राहणाºया वजे ह्यांच्या कडे पैश्याचा तगादा लावल्या नंतर ही पैसे मिळत नसल्याने गावातील निशांत नाईक आणि दीपेश नाईक ह्या दोन तरु णांनी वजे ह्याची भेट घेऊन वृद्धांचे पैसे दे नाहीतर कारवाईला तयार रहा असा दम भरला. त्यामुळे शंभर रु पयांच्या स्टॅम्प पेपर वर सदर व्यक्तीची आपण फसवणूक केली असून २ लाख आणि माझ्या मेव्हण्याचा अपघात झाल्याचे खोटे सांगून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सातपाटी शाखेतून काढलेली ८० हजाराची रक्कम अशी २ लाख ८० हजाराची सर्व रक्कम मी सन २०१७ साला पर्यंत भरण्यास तयार असून पैसे न भरल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील असे लिहूनही दिले. त्यांनतर वजे ह्यांनी दिलेला १ लाखाचा चेक ही वटला नसून पालघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी ह्यांनी ही वजे ह्यांना पोलीस स्टेशन ला बोलावून सदर व्यक्ती चे पैसे परत करण्या बाबत बजावले होते. वजे ह्यांनी खारेकुरण सह अन्य काही व्यक्तीनाही फसवले असून सर्व एकत्र मिळून आता पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. शांताराम नाईक ह्यांचे पैसे मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.दोन लाखांची रक्कम काढलीच क शी?मनोज वजे ह्यांनी जून २०१७ रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतली असून त्याच्या बद्दल ग्राहकांच्या तक्र ारी असताना बँकेने त्याची साधी चौकशी करून कारवाई करण्या चे सौजन्य ही न दाखिवता त्याची स्वच्छनिवृत्तीची मागणी पूर्ण केली.विड्रॉल चेक स्लिप वर ५० हजाराच्या वर ( अत्यावश्यक गरजे व्यतिरिक्त) रक्कम ग्राहकाना दिली जात नसताना वजे ह्यांनी चेक सोबत अन्य कुठलीही कागदपत्रे जोडली नसताना २ लाखाची रक्कम कशी देण्यात आली.त्यामुळे ह्यात अन्य लोकही सहभागी असल्याच्या शक्यते मुळे संबंधित दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्या वृद्धाने केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा