नालासोपाऱ्यात रंगेहाथ पकडून चोराला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:45 IST2018-03-23T00:45:35+5:302018-03-23T00:45:35+5:30

दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणा-या दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले.

Drain in the sidewalk and grabbed a thief | नालासोपाऱ्यात रंगेहाथ पकडून चोराला बदडले

नालासोपाऱ्यात रंगेहाथ पकडून चोराला बदडले

वसई : दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणाºया दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नालासोपाºयातील मोरेगावात असलेल्या जीवदानी कृपा इमारतीच्या दुसºया मजल्यावरील वैभव आरोसकर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून एक चोर शिरला होता. विशेष म्हणजे चोर दरवाजा उघडा ठेऊनच घरात चिजवस्तू शोधत होता.
भाग्यश्री जांबरे या शेजारच्या मुलीने जागृती दाखवून आजुबाजुच्यांना बोलवून घेत चोरीचा बेत हाणून पाडला. नरोत्तम जानी (४८) असे चोरट्याचे नाव असून तो नालासोपा-यातील प्रगती नगरमधील रहिवाशी आहे. गंभीर जखमी झालेल्या चोरट्याने आपण मित्राला भेटायला गेलो होतो अशी कहाणी सांगत पोलिसांचीही दिशाभूल केली. पोलिसांनी जखमी झालेल्या चोरट्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करून चौकशी केली असता तो अट्टल चोरटा असल्याचे उजेडात आले. त्याच्याकडून चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.

भाग्यश्री जांबरे ही शेजारी राहणारी दहावीतील मुलगी घरात आली. तर समोर कपाट उघडून एक अनोळखी इसम काही तरी शोधत असल्याचे तिने पाहिले. हा चोरच असल्याचे क्षणातच लक्षात आलेल्या भाग्यश्रीने चोर चोर करीत बिल्डींगमधील लोकांना सावध केले. त्यासरशी लोकांनी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले.

Web Title: Drain in the sidewalk and grabbed a thief