नालासोपाऱ्यात शिवसेनेला खिंंडार

By Admin | Updated: February 15, 2017 04:30 IST2017-02-15T04:30:22+5:302017-02-15T04:30:22+5:30

नालासोपाऱ्यात शिवसेनेला खिंंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश

In the drain, Shivsena Khandara | नालासोपाऱ्यात शिवसेनेला खिंंडार

नालासोपाऱ्यात शिवसेनेला खिंंडार

वसई : नालासोपाऱ्यात शिवसेनेला खिंंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांच्या स्वागतासाठी उपमहापौरांसह आघाडीचे अनेक नगरसेवक हजर होते.
नालासोपारा पश्चिमेकडील स्टेट बँक कॉलनी, आयडीबी आय कॉलनीतील मधुकर नाकटे, राजेंद्र भोगले, संदेश पडवळ, दत्ता राऊत यांनी आपल्या समर्थकांसह सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र
करून बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. शिवसेनेला हा धक्का मानला जात आहे.
उपमहापौर उमेश नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सभापती पंकज चोरघे, नगरसेवक राजू ढगे, सुषमा दिवेकर, अतुल साळुंखे, किशोर पाटील, निलिमा कांबळे, शबनम शेख, माजी नगराध्यक्ष राजू रोडे यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: In the drain, Shivsena Khandara