टेंबी कोल्हापूरच्या पोलीस पाटलांना डच्च्यू

By Admin | Updated: February 5, 2017 02:15 IST2017-02-05T02:15:56+5:302017-02-05T02:15:56+5:30

गुन्हा दाखल असताना खोटे प्रतिज्ञापत्र देऊन पोलीस पाटील पद पटकावलेल्या टेंबी कोल्हापूरच्या भालचंद्र यशवंत पाटील यांची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात

Dombiv to the police forces of Kolhapur | टेंबी कोल्हापूरच्या पोलीस पाटलांना डच्च्यू

टेंबी कोल्हापूरच्या पोलीस पाटलांना डच्च्यू

वसई : गुन्हा दाखल असताना खोटे प्रतिज्ञापत्र देऊन पोलीस पाटील पद पटकावलेल्या टेंबी कोल्हापूरच्या भालचंद्र यशवंत पाटील यांची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
टेंबी कोल्हापूर येथील रहिवाशी असलेल्या भालचंद्र पाटील यांच्याविरोधात मुंबईतील बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून काही वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद हायवेवर पोलिस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हप्ता गोळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांची पोलीस पाटीलपदी नेमणूक करण्यात आली होती. ही नेमणूक होताना त्यांनी स्वत:विरुद्ध कसलेही गुन्हे दाखल नसल्याचे धडधडीत खोटे प्रतिज्ञापत्र शासनास सादर केले होते. मात्र कोल्हापूर गावातील गोपी सखाराम भोईर ह्यांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पुरावे गोळा करून त्यासह वसई उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी उप विभागीय अधिकारी क्षीरसागर यांनी पाटील ह्यांना खुलासा देण्याकरीता १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र ते समाधानकारक खुलासा देऊ न शकल्याने तत्काळ आदेश काढून त्यांची पदावरून हाकालपट्टी केली. आता त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dombiv to the police forces of Kolhapur