वाडा येथे दरोडा, तीन लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: June 17, 2016 00:37 IST2016-06-17T00:37:38+5:302016-06-17T00:37:38+5:30

शहरातील कांदिवली रोड येथील एका घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गृहिणीला मारहाण करून सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

Doda at Wada, a lump of three lakh rupees | वाडा येथे दरोडा, तीन लाखांचा ऐवज लंपास

वाडा येथे दरोडा, तीन लाखांचा ऐवज लंपास

वाडा : शहरातील कांदिवली रोड येथील एका घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गृहिणीला मारहाण करून सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कादिवली रोड येथे नितीन भानुशाली हे राहतात. आज पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात दरोडेखोरांनी पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूमची लोखंडी जाळी काढून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून नितीन यांच्या पत्नी निकीता यांना बेदम मारहाण करून जखम केले. त्यानंतर घरातील सोने, मोबाईल, व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. दरोडयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Doda at Wada, a lump of three lakh rupees