शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

वाड्यात नव्या नियुक्त्यांमुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 12:17 AM

उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना हटवा : शिवसैनिकांची मागणी

वाडा : वाडा तालुक्यातील शिवसेनेत नुकत्याच कुडूस विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांना जुन्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख उमेश पटारे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे दिल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी कुडूस परिसरातील जुन्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर केली आहे. यामुळे वाडा शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.नियुक्त्या करताना निष्ठावंत व जुन्या शिवसैनिकांना डावलून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली असून जुन्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख धनंजय पष्टे यांनी केला आहे.मनमानी कारभार करणाºया उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख उमेश पटारे यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. लवकरच पालघर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांची आपण यासंदर्भात भेट घेणार असल्याचे धनंजय पष्टे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांविरोधात कुडूसमधील माजी कुडूस विभाग संपर्कप्रमुख जर्नादन भेरे, सुधीर पाटील, नरेंद्र जाधव, मिलिंद चौधरी, पंढरीनाथ पाटील, वैभव ठाकरे, राजेंद्र शेटे, किशोर पाटील आदी जुन्या शिवसैनिकांनी दंड थोपटले असून त्यांना हटवण्याची मागणी केली आहे.जिल्हाप्रमुखांना विचारात घेऊन जुन्या पदाधिकाऱ्यांची पदे कायम ठेवून पक्षवाढीचे काम करणाºयांना संधी देण्यात आली आहे. यात कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही.- सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना पालघर

टॅग्स :Shiv Senaशिवसेना