शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:07 IST

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : पालघर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीआधारित आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रितपणे प्रयोगशील उपक्रम राबवून जिल्ह्याच्या कृषीविकासाची वाट समृद्ध केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत अवलंबली जात असून पारंपरिक भात शेती, भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत, मत्स्यपालन अशा उपक्रमांमुळे कृषीआधारित रोजगार निर्माण होऊ न बेरोजगारीचा बराच प्रश्न सुटला आहे.

डहाणू येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फेविविध उपक्र म राबवले जातात. मागील वर्षभरात जव्हार, मोखाडा यांसारख्या दुर्गम भागात कर्जत-७, कर्जत-९ या भाताच्या सुधारित जातींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे भाताच्या उत्पादनात ३२ टक्के तर नागली, वरी या सुधारित जातींच्या उत्पादनात ४१ टक्के वृद्धी झाली. गळीत धान्यपिकांमध्ये खुरासणी पिकाच्या फुले कारळा या जातीचे उत्पादन स्थानिक जातीच्या तुलनेत ५८ टक्के अधिक आढळले.

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पारंपरिक भात शेतीसह भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत या घटकांचा समावेश केला आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीबाबतही मार्गदर्शन केले. चिकू, नारळ, केळी आदी फळपिकांवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रात्यक्षिके घेतली. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढण्यास भाडेतत्त्वावर अवजारे उपलब्ध झाल्याने श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला. जिल्ह्यात कृषि विज्ञान मंडळ, तालुका स्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि ग्रामपातळीवर महिला मंडळ, शेतकरी मंडळ यांच्यामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. प्रकल्प संचालक आत्मा योजनेतून राबवलेला चारा पीक, मोगरा पिकाच्या लागवडीच्या प्रशिक्षणाचा जिल्हयातील २०० शेतकºयांना फायदा झाला. गेल्या वर्षी ८२ महिला बचतगट तयार करून महिला सबलीकरणासाठी शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. मधमाशी पालन प्रशिक्षण दिल्याने १२०० शेतकºयांना फायदा झाला. यामध्ये १२ युवक मास्टर ट्रेनर झाले.

अळंंबी लागवड, फळ रोपवाटिका या व्यवसायाचे अनुक्र मे ४० आणि ३० युवकांना प्रशिक्षित केल्याने स्वयंरोजगार निर्मिती झाली. मत्स्यशेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने २० युवकांनी मत्स्यसंवर्धन करण्यास सुरुवात केली. परंपरागत कृषी योजनेमार्फत शेतकºयांचे सेंद्रिय शेती गट तयार करण्यात आले. हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून दोन वेळा शेतकरी सल्ला देण्यात येत आहे. त्याचा पीक नियोजनासाठी फायदा होत आहे. शेतकºयांना माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे जिल्ह्यातील १५०० शेतकºयांना त्याचा फायदा झाला. आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायाबाबत जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास कृषिविज्ञान केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव म्हणाले.शहरांची भाजीपाल्याची गरज केली पूर्ण जिल्ह्यातील १२१ शेतकºयांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर मिळाले. ९२ जणांना शेततळे दिल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. जमीन आरोग्यपत्रिका पथदर्शी प्रकल्प, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविले.कृषी विकासाचा पाया मजबूत झाल्यानेच लॉकडाऊन काळात शेतकरी गटाने पिकवलेला कृषी माल निर्यात करून महापालिका क्षेत्रातील भाजीपाल्याची निकड पूर्ण केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरी