शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उघड्यावरील मासळी विक्रीमुळे ‘अस्वच्छ डहाणू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:27 IST

सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे.

- शौकत शेख डहाणू : सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करुन मासळी बाजारासाठी सुसज्ज इमारत बांधुनही तिकडे कुणी फिरकत नसल्याने ‘स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू’ उपक्रम अपयशी ठरत आहे.साठ हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा येथे रस्त्यावर बसणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड, हैद्राबाद यांच्या कडून महाराष्टÑ राज्या मत्स्य उद्योग महामंडळ यांच्या मार्फत डहाणू लोणीपाडा येथे अद्यावत मासळी मार्केट बांधण्यात आले आहे. तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या दोन वर्षा पासून धूळखात पडली आहे.सध्या हे ठिकाण जुगार तसेच दारू व गांजा पिणाºयांचा अड्डा झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी डहाणू पारनाका, डहाणू बीच, येथे पर्यटकांच्या सोयी, सुविधांसाठी डहाणू नगरपरिषद व वनसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस लाख रूपये खर्च करून पर्यटन योजनेअंतर्गत स्टॉल, केबीन बनविण्यात आली होती. हे स्टॉल स्थानिक महिला बचतगटांना रोजगार पूरविण्याच्या दृष्टीने देण्यात येणार होती. परंतु पावसाळयात त्याची तुटफूट होऊन सर्व स्टॉल उध्दस्त झाले व शासनाचा निधी वाया गेला आहे. एका बाजुला रस्त्यावर बसणाºया मच्छीमार महिलांना हक्काचे मासळी मार्केट मिळावे यासाठी कोळी बांधव आंदोलन करीत असतांनाच डहणू येथे गेल्या अडीच वर्षापासून सुसज्ज असे मासळी मार्केट बांधून तयार असतांनाच डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे प्रशस्त इमारत ओस पडली असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.>रखडलेले सुशाभिकरणदरम्यान शासनाच्या पर्यटन विकास निधीमध्ये डहाणू गावातील मास्जिद नाका येथे गेल्या तीन, चार वर्षापासून रस्ते, तलाव सूशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्याच्यावर साठ ते सत्तर लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून काम बंद आहे. पाठपुराव्याच्या अभावी हे काम रखडले आहे.>मच्छिमार महिला नव्या मार्केटमध्ये जाण्यास तयार नाहीत.- विजयकुमार द्वासे, मुख्याधिकारी, डहाणू न.प.मासळी मार्केट