धिक्कार मोर्चा अखेर रद्द, प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:17 IST2018-08-16T01:16:53+5:302018-08-16T01:17:46+5:30
शुक्र वार, १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सर्व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी पाठ फिरविल्याने हा मोर्चा रद्द झाला आहे.

धिक्कार मोर्चा अखेर रद्द, प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी फिरवली पाठ
नालासोपारा - मोठा गाजावाजा करून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणारा सर्वपक्षीय धिक्कार मोर्चा रद्द झाला आहे. शुक्र वार, १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सर्व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी पाठ फिरविल्याने हा मोर्चा रद्द झाला आहे.
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे वसईत पुरपरिस्थिती आली होती. ८ दिवस वसईकर पाण्यात होतो. या पुराने ५ जणांचा बळी घेतले तर कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले होते. महापालिका प्रशासन पूर्ण हतबल ठरले होते. या पुरपरिस्थिबाबत वसईच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना जाब विचारण्यासाठी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनआंदोलन समितीचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षांशी संपर्क करण्यास सुरवात केली होती. शुक्र वार १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र आता हा मोर्चा बारगळला आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी दोन बैठका आयोजिक करण्यात आल्या होत्या. मात्र त्या बैठकीला प्रमुख विरोधी पक्षांनी पाठ फिरवल्याने संपुर्ण नियोजनावर पाणी फिरले.
विरोधी पक्ष काय म्हणतात...
कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी या मोर्चात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही पालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. त्यांनी आमच्या सुचना मान्य करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मग पुन्हा मोर्चा का असा सवाल करत कॉंग्रेस या मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे स्थानिक नेते पहिल्या बैठकीला हजर होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. जनआंदोलन समितीतून बाहेर पडून मी वसईकर मोहीम चालविणारे मिलिंद खानोलकर यांनीही या मोर्चात जाणार नसल्याचे सांगितले. मनसेचा एकही पदाधिकारी बैठकीला फिरकला नाही. भाजप नेत्यांना बोलावूनही कुणी बैठकीला आले नाही. त्यामुळे मोर्चा कसा काढायचा असा प्रश्न पडला आहे. वसई पर्यावरण संवर्धक समितीच्या समीर वर्तक यांनीही अशा सवंग मोर्चाची गरज नसल्याचे सांगितले.
ठाकुरांच्या विरोधात
गर्जना करणारे गप्प
याबाबत बोलताना या मोर्च्याचे समन्वयक प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले की जनतेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राग आहे. ते मोर्चात सहभागी होणार होते. परंतु राजकीय पक्षांनी माघार घेतली. मी सर्व पक्षांच्या नेत्यांशी वैयिक्तक संपर्क साधला होता. एरवी ठाकूरांच्या विरोधात गर्जना करणारे आता गप्प बसले असा आरोप त्यांनी केला. वसईतील पुरपरिस्थितीवर सर्वांनी पालिका आणि सत्ताधाºयांवर आरोप केले होते. त्यावेळी आमदार ठाकूर यांनी आरोप करणाºयांना एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले होते. त्याला देखील अजून कुणी प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान आमदार हितेंद्र ठाकुर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आमदार ठाकुर यांनी एकाच व्यासपिठावर सर्वांनी एकत्र या असे आवाहन करूनही कोणी प्रतिसाद दिला नव्हता. मुद्दे नसल्यामुळे इतर विरोधी पक्षांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे हा मोर्चा रद्द करणे हे हास्यास्पद आहे.
- सुदेश चौधरी, बहुजन विकास आघाडी जेष्ठ नेते