विकासकाने केले शौचालय जमीनदोस्त
By Admin | Updated: September 10, 2015 23:50 IST2015-09-10T23:50:22+5:302015-09-10T23:50:22+5:30
सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून घरोघरी शौचालय बांधून गाव-पाडे-वस्त्या हागणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उपक्रम हाती घेतला असतानाच बोईसर जवळील

विकासकाने केले शौचालय जमीनदोस्त
बोईसर: सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून घरोघरी शौचालय बांधून गाव-पाडे-वस्त्या हागणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उपक्रम हाती घेतला असतानाच बोईसर जवळील पास्थळ-सालगाव ग्रामपंचायतीने कुतरखाडी येथे २००६ साली ३,१५,२७५ रु. खर्चून सध्या सत्तर कुटुंब वापरत असलेले सार्वजनिक शौचालय विकासकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. या प्रकरणी तारापूर पोलीस स्थानकात ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हा नोंदविला आहे.
विकासकाने त्याच्या जागेत जाण्यासाठी रस्ता मोठा व्हावा याकरीता सार्वजनिक वापरातील शौचालय ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी न घेता जे.सी.बी. ने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने तारापूर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.