बचत गटांच्या माध्यमातून विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 01:11 IST2015-05-11T01:11:28+5:302015-05-11T01:11:28+5:30

महिलांनी स्वतंत्र मासे विक्री न करता बचत गटांची स्थापना करून महानगरपालिकेने तयार केलेल्या मच्छिमार्केटमध्ये ठेका पद्धतीने सामुहिक व्यवसाय करावा, असे मत आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केले.

Develop development through savings groups | बचत गटांच्या माध्यमातून विकास साधावा

बचत गटांच्या माध्यमातून विकास साधावा

विरार : महिलांनी स्वतंत्र मासे विक्री न करता बचत गटांची स्थापना करून महानगरपालिकेने तयार केलेल्या मच्छिमार्केटमध्ये ठेका पद्धतीने सामुहिक व्यवसाय करावा, असे मत आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केले. वसई-विरार शहर पालिकेतर्फे केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या ९० टक्के अनुदानातून आगाशी आणि बोळींज येथे उभारलेल्या मच्छिमार्केटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार विकास तरे, महापौर नारायण मानकर, उपमहापौर रुपेश जाधव, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी उपमहापौर डांगे, स्थायी समिती सभापती संदेश जाधव, माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र शहा, अजीव पाटील, आयुक्त गोविंदराव राठोड आदी उपस्थित होते.

> बोळींज येथे २ कोटी ३५ लाख तर, आगाशी येथे २ कोटी ४० लाख रुपये खर्च करून अद्यावत मच्छिमार्केट तयार करण्यात आले.

Web Title: Develop development through savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.