शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

आदिवासींचा सर्वांगीण विकास करु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:09 PM

जव्हार, मोखाड्यामध्ये पंडित यांचा दौरा : वीज अन् नेटवर्कची समस्या मुख्यमंत्र्याकडे मांडणार

हुसेन मेमन 

जव्हार : जव्हार, मोखाड्यातील दौरा करताना काही समाधानकारक बाबी समोर आल्या. मात्र, येथील नेटवर्कचा मुद्दा अतिशय गंभीर असून कनेक्टिव्हीटीच जर नसेल तर इथली आणि शहरी भागातील दरी कधीच भरुन निघणार नाही. वीज आणि नेटवर्क भरपूर असल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही. यामुळे आॅनलाईन केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार तसेच, रोजगार आरोग्याच्या समस्या आश्रमशाळांची दुरवस्था या सर्व समस्याच्या सोडवणुकीसाठी मी कटिबद्ध असून या सर्व अडचणी लवकरच मुख्यमंत्र्यासमोर मांडणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे राज्यस्तरीय अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी जव्हार व मोखाडा येथे केले.

पंडित यांनी या आढावा दौऱ्यात चौफेर योजनाचा आढावा घेत येथे राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची माहिती घेतली. तसेच मुख्यत: प्रत्येक विभागातील रिक्त पदांची माहिती घेत ही पदे भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख बाब म्हणजे बºयाचशा योजना सध्या आॅनलाईन असल्याने दिरंगाई होताना दिसत आहे. यामुळे प्रामुख्याने या ठिकाणी नेटवर्किंगचे जाळे असणे गरजेचे असल्याची भावना पंडित यांनी व्यक्त केली. कारण रेशन रोजगार हमीचे पगार अशा लोकांच्या जीवनाशी निगडित सर्व योजनांचा संबंध नेटवर्कशी असल्यामुळे भारत आणि र्इंडीयाची दरी वाढतच जाईल, अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली तर वनविभागाच्या हुकुमशाही कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.यावेळी पंडित यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तेथील सौर पॅनल रिक्त पक्ते याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले तर मोखाडा शासकीय विश्राम गृहमध्ये सर्व विभागांचा आढावा घेतला त्यानंतर शाळाबाह्य मुलींच्या कस्तुरबा बालिका विद्यालयाला भेट देवून तेथील सर्व परिस्थितीची माहिती घेतली.याशिवाय इमारत दुरु स्तीसाठी तत्काळ पाउले उचलण्याचे आदेशही यावेळी दिले तद्नंतर शेलमपाडा येथील अंगणवाडीला भेट दिली आणि तेथील जिल्हा परिषदेच्या पडलेल्या शाळेचेही पाहणी दौºयाच्या शेवटी सूर्यमाळ आश्रमशाळेची पाहणी करत पंडित यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील नवीन आश्रमशाळा इमारतीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला असून जिल्हाधिकारी यांनी कार्यवाहीचे आदेश देवूनही कारवाई न झाल्याने पंडित यांनी तीव्र नारजी व्यक्त केली. या संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले तर सूर्यमाळ प्रमाणेच पळसुंडा आश्रमशाळेचेही काम रखडले असल्याचा मुद्दा यावेळेस समोरआला.प्रमुख अधिकाºयांची उपस्थितीयासर्व आढावा दौºयात विविध विभागातील सर्व योजनांची माहिती घेवून ती सोडवून आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत दै.लोकमतशी बोलताना व्यक्त केले. यावेळी साहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत भारती, तहसीलदार शेटे, कृषी अधिकारी बी.डी. सूर्यवंशी, उपविभाग अभियंता दिलीप बाविस्कर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य संतोष चोथे, शिवसेना विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद कदम, सभापती प्रदीप वाघ तसेच सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना