शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पालघरमधून आणखी २४०० मजुरांची परराज्यांत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:00 IST

पालघर तालुक्यातून ८०० तर बोईसर भागातून ४०० अशी एकूण १ हजार २०० कामगारांनी तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे अर्ज सादर केले होते.

 पालघर : जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूर व कामगारांसाठी रविवारी पालघरमधून एक आणि वसई रोड स्थानकातून एक अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मध्य प्रदेशातील झाबुवा येथील १२०० लोकांना त्यांच्या मूळ गावी घेऊन पालघर रेल्वे स्थानकातून एक ट्रेन रात्री ९ वाजता, तर वसई रोड स्थानकातून उत्तर प्रदेशातील जौनपूरकडे १२०० प्रवाशांना घेऊन एक ट्रेन सायंकाळी ७ वाजता रवाना झाली.पालघर तालुक्यातून ८०० तर बोईसर भागातून ४०० अशी एकूण १ हजार २०० कामगारांनी तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे अर्ज सादर केले होते. या अर्जांची छाननी करून ती सर्व कागदपत्रे मध्य प्रदेश शासनाकडे पाठविली. या सर्व प्रवाशांचा खर्च मध्य प्रदेश सरकारने उचलला असून त्यांच्याकडून मान्यता मिळाली. रविवारी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी झाल्याने यादीत नाव असलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रविवारी रात्री ९च्या सुमारास या विशेष गाडीला जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, तहसीलदार शिंदे आदींनी झेंडा दाखविल्यानंतर ट्रेन मध्य प्रदेशकडे रवाना झाली.ंवसईतून १२०० मजूर जौनपूरच्या दिशेनेवसई : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १२०० कामगार व मजुरांना घेऊन वसई रोड ते जौनपूर ही विशेष रेल्वेगाडी रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास रवाना झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी ‘लोकमत’ला दिली. वसई, विरार व जिल्ह्याच्या विविध भागांतील मजुरांना शनिवारी व रविवारी सनसिटीच्या मैदानात जमा होण्यास सांगण्यात आले. तिथे त्यांना जेवण, नाश्ता, प्रवासासाठी खाणे देऊन बसने वसई स्थानकात आणले गेले. तिथे आरोग्य तपासणी करून मास्क सॅनिटाईज करून गाडीत प्रवेश दिला गेला. वसई व जिल्ह्यातील विविध भागातील या कामगार-मजुरांना घेऊन या आठवड्यातील ही २२ डब्यांची दुसरी विशेष गाडी दुपारी २.३० वाजता सुटणार होती, मात्र सर्व १२०० मजूर कामगार यांची रीतसर तपासणी व व्यवस्थापन करेपर्यंत वेळ गेल्याने अखेर ही गाडी संध्याकाळी ७.०० च्या सुमारास रवाना झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे