रेल्वेच्या विलंबाने सफाळेवासीय अत्यंत त्रस्त
By Admin | Updated: April 18, 2016 00:31 IST2016-04-18T00:31:24+5:302016-04-18T00:31:24+5:30
सफाळे व येथील पश्चिम रेल्वेच्या भागात रेल्वेगाड्या उशिरा येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वेळेवर पोहोचता न आल्याने चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना
रेल्वेच्या विलंबाने सफाळेवासीय अत्यंत त्रस्त
सफाळे : सफाळे व येथील पश्चिम रेल्वेच्या भागात रेल्वेगाड्या उशिरा येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वेळेवर पोहोचता न आल्याने चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना दर महिन्यात नाईलाजाने तीन-चार तरी दांड्या माराव्या लागत आहेत. तर अनेकदा लेटमार्कचे धनी व्हावे लागत आहे. असा प्रकार संध्याकाळी रात्री झाल्यास घरी परतण्यास उशीर होण्याबरोबर रिक्षाचा भुर्दंडही सोसावा लागतो आहे .
उशिराने धावणाऱ्या गाड्या, कधीकधी त्यामध्ये झालेला तांत्रिक बिघाड या सर्वांमुळे विद्यार्थी व नोकरदारवर्गाचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे नोकरीवर लागणारा लेटमार्क, जाण्यास होणारा विलंब, घरी येण्यास होणारा उशीर, अशा अनेक समस्यांना विरार ते डहाणू बाजूला राहणाऱ्या लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण दिसून येते. लांब पल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या, हॉलिडे स्पेशलमुळे या मार्गावरून नियमित धावणाऱ्या गाड्यांना नेहमीच उशीर होत असतो. लोकलला होणारा नेहमीचा उशीर, मेमो ठरलेल्या स्थळी ३०-४० मिनिटे उशिराने येणे, दोन गाड्यांमध्ये असणारा मोठा वेळ यामुळे या गाडीसाठी तिष्ठत उभे असलेले हजारो प्रवासी हे चित्र रोजच पाहायला मिळते. (वार्ताहर)