कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:21 IST2020-06-11T00:21:24+5:302020-06-11T00:21:34+5:30
अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले

कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत
विक्रमगड : जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी २०१९-२० च्या खरीप हंगामात प्राथमिक सहकारी संस्थांकडून हजारो रुपयांचे कर्ज उचलले होते. हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे फेडलेले आहे, मात्र ज्यांनी कर्ज फेडले नाही, त्यांना कर्जमाफी झाली आहे. तरी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आता प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले. नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकरी वर्गास शासनाने कर्जमाफीत बसवले नाही व कर्ज थकवणाºया शेतकरी वर्गास योजनेचा लाभ दिला. थकबाकीदार शेतकरी नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र झाले. हे धोरण चुकीचे असून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गावर अन्याय करणारे आहे. जून महिना सुरू झाला असून या वर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे वेधशाळेने म्हटलेले आहे. खरीप हंगामाची कामे सुरू होताना दिसत आहेत. शेतकरी वर्ग प्राथमिक कामाच्या गडबडीत आहे. प्रामाणिक शेतकरी वर्गाने मुदतीत पीककर्ज भरले असल्याने महाराष्ट्र शासनाने अधिवेशन काळात दिलेला शब्द पाळून शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर प्रोत्साहन पार रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने विक्रमगड येथील जाणकार शेतकरी व सहकारी संस्थेचे चेअरमन घनश्याम आळशी यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.
प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकºयांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी आता केली जात आहे. परंतु, दोन महिने झाले तरी या प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गाच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर ५० हजार रक्कम जमा झालेली नाही. कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने अडचणी येत आहेत.