शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

वाड्यातील दाखलेवाटप शिबिराचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:16 IST

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची गरज भासते ती लक्षात घेऊन वाडा तहसील कार्यालयाकडून तालुक्यात दाखले वाटप शिबिराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. परंतु...

वाडा - दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची गरज भासते ती लक्षात घेऊन वाडा तहसील कार्यालयाकडून तालुक्यात दाखले वाटप शिबिराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. परंतु दुपारी दीड वाजेपर्यंत तहसील कार्यालयाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने पालक व विद्यार्थांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविला.विद्यार्थ्यांना दाखले वेळेवर मिळावेत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वाडा तहसील कार्यालयामार्फत शिबीरे आयोजिण्यात आली आहेत. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, डोंगरी विभाग दाखला, रहिवासी दाखला असे विविध दाखले देण्यात येतात. आज वाडा तलाठी कार्यालय येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास सेतू कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. मात्र तहसील कार्यालयातील एकही अधिकारी तथा सक्षम कर्मचारी दुपारी दीड वाजेपर्यंत शिबिरास्थळी उपस्थित नव्हता. त्यामुळे पालक व विद्यार्थांना ताटकळत उभे राहावे लागले होते. येथील सामाजिक कार्यकर्ते भानुशाली यांनी शिबीरास्थळी भेट दिली असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी निवासी नायब तहसीलदार रिताली परदेशी यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती त्यांना सांगितल्यानंतर कर्मचारी तिथे दाखल झाले.वाडा तहसीलदार कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू असून या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. दाखल्यांसाठी विद्यार्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. कधी तलाठी सही करीत नाहीत तर कधी अधिकारी जागेवर नसतात. अशा अनेक तक्र ारी विद्यार्थी व पालक करीत आहेत. वेळेवर दाखले न मिळाल्यास विद्यार्थांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. महिनोनमहिने दाखले सेतू कार्यालयात सही विना पडून आहेत. त्यावर सह्या होणार तरी कधी? अशी विचारणा विद्यार्थी करीत आहेत. त्याचे उत्तर कुणाकडेही नाही.अधिकारी निवडणूक कामात व्यस्तवाड्याचे तहसीलदार दिनेश कुºहाडे हे निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ते या कार्यालयात दिसत नाहीत. पालघर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तिच्या कामात ते व्यस्त असल्याने त्यांना कार्यालयात लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तसेच त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने वाडा तहसीलदार कार्यालयातील कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तसेच तहसीलदारांच्या अनुपिस्थतीत निवासी नायब तहसीलदार कार्यालयाचा कारभार चालवतात. त्यांच्याकडेही वाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाºयांचा अतिरिक्त कार्यभार आहे.त्यामुळे त्यांनाही वेळ देता येत नाही त्यातच त्यांनाही निवडणूक कामासाठी जावे लागत असल्याने तहसील कार्यालयात कामांची ऐसी की तैसी आहे.पालकांच्या तक्र ारी नंतर तत्काळ मंडळ अधिकाºयांना दूरध्वनी करून शिबीरस्थळी पाठविण्यात आले.-रिताली परदेशी,नायब तहसीलदार, वाडामी गेल्या अनेक दिवसापासून दाखल्यांसाठी फेºया मारत असून सुध्दा मला दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे माझ्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.- सुधीर अधिकारी, पालकमी ६ जून रोजी उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, रहिवासी दाखला मिळावेत म्हणून सेतू कार्यालयात अर्ज केले आहेत. मात्र मला अद्यापपर्यंत दाखले मिळालेले नाहीत. नुसते हेलपाटे मारावे लागत आहेत.- सुरेश पाटील, पालक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या