बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू

By Admin | Updated: September 8, 2016 02:11 IST2016-09-08T02:11:49+5:302016-09-08T02:11:49+5:30

तलासरी तालुक्यातील आमगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम (२६) याचा बुधवारी मृत्यू झाला.

The death of the leopard is finally death | बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू

तलासरी : तलासरी तालुक्यातील आमगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम (२६) याचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना मुंबईतील केईएम आणि नंतर जेजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.
बिबट्याने १५ आॅगस्टला वसंत इरिम याच्यावर हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पहिल्यांदा सुरत येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने सुरतच्या सिव्हील रु ग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यास मुंबई येथे केईएममध्ये नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, केईएमच्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीची तपासणी करून जे जे येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तेथे दाखल करून न घेता घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. वसंत इरिम यास घरी घेऊन आल्यावर रात्री त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती दसमा इरिम याने लोकमतला दिली. (वार्ताहर)

Web Title: The death of the leopard is finally death