साकूर आश्रमशाळेतील चौथीच्या मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: August 28, 2015 23:16 IST2015-08-28T23:16:22+5:302015-08-28T23:16:22+5:30
जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत असणाऱ्या आदिवासी मुलींच्या निवासी शासकिय वस्तीगृहातील इ. ४ थीत शिकणारी रसीला मधुकर तेलम (१०) हिचा शुक्रवार दिर्घ आजाराने मृत्यु झाला

साकूर आश्रमशाळेतील चौथीच्या मुलीचा मृत्यू
जव्हार : जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत असणाऱ्या आदिवासी मुलींच्या निवासी शासकिय वस्तीगृहातील इ. ४ थीत शिकणारी रसीला मधुकर तेलम (१०) हिचा शुक्रवार दिर्घ आजाराने मृत्यु झाला आहे. मात्र पालकांनी तिच्या मृत्यू विषयी संशय व्यक्त केला आहे.
रसीला ही गेले अनेक दिवस आजारी होती, गुरूवारी रात्री तिची प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे, तिला जव्हार येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतू तिची प्रकृती अधिक खाल्यावल्यामुळे तिला नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात अधिक उपचाराकरीता दाखल करण्यात आले, परंतू तिनी उपचारास प्रतिसाद दिला नाही, व दुर्देवाने तिचा उपचारा दरम्यान, तिचा मृत्यु झाला. (वार्ताहर)
या घटनेबाबत मला अधिक माहिती नाही, मी सध्या बाहेरगावी असल्यामुळे आल्यानंतर चौकशी करतो, या घटनेत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- लोमेश सलामे, प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. जव्हार