देवबांध घाटात कार कोसळून कंठेंचा मृत्यू
By Admin | Updated: December 29, 2015 00:06 IST2015-12-29T00:06:42+5:302015-12-29T00:06:42+5:30
सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास खोडाळ्याहुन डोल्हाराकडे येत असताना देवबांध घाटात कार वरचा ताबा सुटल्याने वॅगनर कार २५० फुट दरीत कोसळून अंबरनाथ येथील महात्मा

देवबांध घाटात कार कोसळून कंठेंचा मृत्यू
मोखाडा : सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास खोडाळ्याहुन डोल्हाराकडे येत असताना देवबांध घाटात कार वरचा ताबा सुटल्याने वॅगनर कार २५० फुट दरीत कोसळून अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक भरत तानाजी कंठे (वय ४५ वर्ष) याचा अपघाती मुत्यू झाल्याची घटना घडली आहे
या घटनेचीमाहिती मोखाडा पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनंत माने पोहचून याचा अधिक तपास करीत आहेत
मोखाडा खोडाळा या मुख्य रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ आहे तसेच या रस्त्यावर देवबांध घाट रस्ता अपघाती असल्याने वारंवार या घाटात अपघात होत असतात नुकताच या घाटात सिमेंट चा ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हा अपघात घडून शिक्षकाचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे परंतु असे असताना देखील याकडे सां बा विभागाचे दुर्लक्ष आहे कारण येथे अपघाती सूचना फलक नाहीत संरक्षण भिंतीचा अभाव आहे
परंतु मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे यामुळे संताप व्यक्त केला जात असून विकास कामाच्या नावाखाली करोडोंचा खर्च करणारे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार असा प्रश्न यानिमित्ताने जनतेकडून उपस्थित होत असुन उप अभियंता प्रवीण भोसले यांना विचारला जात आहे. (वार्ताहर)