बेपत्ता मुलांचे मृतदेह तलावात
By Admin | Updated: September 5, 2015 22:51 IST2015-09-05T22:51:55+5:302015-09-05T22:51:55+5:30
नालासोपारा पूर्वेस वाकणपाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह पाड्यातील तलावातच आढळले. ही दोन्ही मुले अचानक बेपत्ता झाल्यामुळे वालीव पोलिसांनी अपहरणाचा

बेपत्ता मुलांचे मृतदेह तलावात
वसई : नालासोपारा पूर्वेस वाकणपाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह पाड्यातील तलावातच आढळले. ही दोन्ही मुले अचानक बेपत्ता झाल्यामुळे वालीव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
परिसरातील लहान मुले गायब होण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे येथील नागरिकांनी शुक्रवारी वालीव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. ताहीर खान (११) व अरबाज शेख (१०) ही दोन मुले अचानक बेपत्ता झाली होती. यापूर्वी सोने बिद (८) हा मुलगाही बेपत्ता झाला होता. अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्यामागे एखादी टोळी असावी, असा संशय पोलिसांना होता. सायंकाळी या दोन्ही मुलांचे मृतदेह पोलिसांनी तलावाबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)