शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

उपवन संरक्षक कार्यालयाने बांधले १५० बंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 00:30 IST

वन्यजीव आणि नागरिकांना मिळणार दिलासा

डहाणू: डहाणू उपवन संरक्षक कार्यालयातर्फे दहा वन परिक्षेत्राअंतर्गत लोकसहभागातून १५० वनराई बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. आगामी काळात त्यामुळे परिसरातील जलसाठा वाढून वन्यजीवांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी उपयोग होणार आहे.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर डहाणू उपवन संरक्षक अधिकारी विजय भिसे यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया डहाणू, बोर्डी, कासा, उधवा, बोईसर, दहिसर, सफाळे, पालघर, मनोर आणि भाताने या वन परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह योजनाबद्धरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

हा उपक्रम राबविताना लोकसहभाग केंद्रस्थानी होता. स्थानिकांच्या मदतीने भौगोलिक परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आणि पाणी असलेल्या ओहळावर रिकाम्या पोत्यांचा वापर करून त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहासह आलेली माती भरण्यात आली. याकरिता वन कर्मचाºयांसह त्या-त्या भागातील महिला-पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय विभागातील कर्मचारी यांनी श्रमदानातून बंधारे बांधले. यावेळी मातीचा वापर करण्यात आल्याने, ओहळाचे खोलीकरण होऊन पुढील काळात पावसाचे अधिक पाणी अडवता येणार आहे. दरम्यान, दहा वनपरीक्षेत्रांपैकी पालघर येथे सर्वाधिक ४०, बोईसर ३८, उधवा २१, कासा १३ आणि दहिसर १० यांनी दोन अंकी आकडा गाठला असून अन्य ठिकाणी २८ असे एकूण १५० वनराई बंधारे बांधण्यात आले.पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून पावसाळ्यात डोंगरावरून समुद्राकडे वाहून नेणारे अनेक ओहळ आहेत.

पावसाळा संपल्यानंतर त्यापैकी काही बंधारे हिवाळ्यातही वाहत असल्याने त्यावर बांध घातल्याने पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढून विहिरी, कूपनलिकाद्वारे नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. शिवाय गुरा-ढोरांप्रमाणेच रब्बी हंगामातील शेतीलाही त्याचा लाभ होणार आहे. येथील जंगलात असलेल्या बिबट्या, तरस, भेकर, रानडुकर अशा विविध वन्यजीव, पशू - पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काही वर्षांपासून ‘नाम’ आणि ‘पानी’ फाउंडेशनद्वारे राज्यातील विविध ठिकाणी वॉटरकप तसेच बंधारे बांधले गेले. सिनेकलावंतांनी त्यामध्ये पुढाकार घेतल्याने सामान्य नागरिकांना या योजनेची प्रेरणा मिळाली. त्यामुळे सर्वचस्तरातील नागरिक फावडा, घमेलं घेऊन वनकर्मचाºयांसह श्रमदानाकरिता एकवटले होते.

जिल्हाधिकाºयांच्या आवाहनानंतर या विभागाअंतर्गत १० वनपरीक्षेत्रात लोकसहभागाला महत्त्व देऊन श्रमदनातून १५० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याचा फायदा वन्यजीव आणि नागरिकांना शेती व पिण्याकरिता होणार आहे.- विजय भिसे, उपवन संरक्षक, डहाणू 

टॅग्स :riverनदीVasai Virarवसई विरार