डहाणूत अवैध बांधकामांना चढला जोर

By Admin | Updated: March 28, 2016 02:24 IST2016-03-28T02:24:23+5:302016-03-28T02:24:23+5:30

डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका रेशनकार्डाला आधारकार्डाशी संलग्न करणे, शिवाय मार्च अखेर असल्याने सरकारी कामानिमित्त डहाणू तालुका मुख्यालयात मंडळ

Dahanu's rise to illegal construction | डहाणूत अवैध बांधकामांना चढला जोर

डहाणूत अवैध बांधकामांना चढला जोर

- शौकत शेख,  डहाणू
डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका रेशनकार्डाला आधारकार्डाशी संलग्न करणे, शिवाय मार्च अखेर असल्याने सरकारी कामानिमित्त डहाणू तालुका मुख्यालयात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यासह शासकीय यंत्रणा गुंतलेली असल्याचा पुरेपूर फायदा घेऊन माती, रेती माफियांनी डहाणूतील चिंचणी, वानगाव, ऐना, चिखला, आंबेसरी, जामशेत, ऐना, दाभोण, निकाणे, दापचरी, कासार, चारोटी, आशागड, सावरा येथे हैदोस घातला आहे.
डहाणू तालुक्यात येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यासाठी महसूल आणि पोलीस अधिकारी कामात व्यस्त असल्याचा फायदा उठवून डहाणू तालुक्यात कासा, आशागड, चिंचणी या भागात विशेषत: उपनगरात बेकायदा बांधकामांना अक्षरश: ऊत आला आहे. डहाणू-जव्हार राज्यमार्गावरील चारोटी, कासा येथे केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने रस्त्याच्याकडेला मोठेमोठे गाळे बांधले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्ट्या आल्याने रात्रंदिवस बांधकाम सुरु होते तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन शर्तीचा सर्रासपणे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुट्ट्या असल्याने येथील माती, रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. गुजरात येथील गोड डहाणू, बोईसर भागात प्रचंड मागणी असल्याने दररोज पहाटे मोठ्या प्रमाणात रेतीचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला आहे. तर डहाणूच्या जंगलपट्टी भागातील आंबेसरी, ऐना, सायवन, गंजाड भागात केवळ नाममात्र म्हणजेच पाच, दहा, ब्रास मातीची वाहतूकीची रॉयल्टी घेऊन शेकडो ब्रास मातीची वाहतूक करण्यात आली आहे. वानगाव, देहणे, आगवन भागात गेल्या चारपाच दिवसांपासून डोंगरदऱ्यात उत्खनन सुरु असून महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संशय व्यक्त केले जात आहे.

Web Title: Dahanu's rise to illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.