डहाणूच्या कब्रस्तानात बेवारस बालिका

By Admin | Updated: September 14, 2015 23:08 IST2015-09-14T23:08:11+5:302015-09-14T23:08:11+5:30

डहाणूतील पारनाका येथील कब्रस्तानात चार ते पाच दिवसांची बालिका बेवारस आढळली. डहाणू पोलिसांनी तत्काळ तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती ठणठणीत

Dahanu's graveyard unturned girl | डहाणूच्या कब्रस्तानात बेवारस बालिका

डहाणूच्या कब्रस्तानात बेवारस बालिका

डहाणू : डहाणूतील पारनाका येथील कब्रस्तानात चार ते पाच दिवसांची बालिका बेवारस आढळली. डहाणू पोलिसांनी तत्काळ तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
डहाणू येथील शेख बाबू साहब यांच्या दर्ग्याशेजारी असलेल्या खाजण जमिनीवर रविवारी दुपारी एका बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्याचे तेथून जात असलेल्या एका महिलेने सय्यद अंजूम पीरजादा यास सांगितले.
त्यानंतर, पोलिसांना बोलावून त्यांनी या बालिकेला पोलिसांच्या ताब्यात दिले. मातृत्व लपविण्यासाठी जन्मदात्यांनी हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तिला पाहण्यासाठी रुग्णालयात रिघ लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Dahanu's graveyard unturned girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.