कचरा पेटल्याने डहाणूत वायर्सला लागली आग

By Admin | Updated: March 27, 2017 05:29 IST2017-03-27T05:29:49+5:302017-03-27T05:29:49+5:30

डहाणू शहरातील सागर नाक्यानजिक जनता बँके समोरील अढिया बिल्डिंग, जलाराम कृपा

Dahanu Vires woke up after collecting garbage | कचरा पेटल्याने डहाणूत वायर्सला लागली आग

कचरा पेटल्याने डहाणूत वायर्सला लागली आग

बोर्डी : डहाणू शहरातील सागर नाक्यानजिक जनता बँके समोरील अढिया बिल्डिंग, जलाराम कृपा व जलाराम मॅन्शन या इमारतींच्या मधल्या भागात साचलेल्या कचऱ्याला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने इमारतींच्या मध्ये व भिंतींवर लोंबकळणाऱ्या वायर्स आणि केबलनी पेट घेतला. पोलिसांनी अग्निशामक दलाला तत्काळ पाचारण केल्यानंतर त्याने ही आग नियंत्रणात आणली. यात कोणतीही मनुष्य आणि वित्तहानी झाली नाही.परंतु लोंबकळणाऱ्या वायर्स, केबल्स किती धोकादायक आहेत हे स्पष्ट झाले. (वार्ताहर)

Web Title: Dahanu Vires woke up after collecting garbage