शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

चौथ्या राष्ट्रीय गलोल स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:32 AM

पाच सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्यपदकांची लयलूट : मिनिस्ट्री आॅफ युथ अफेअर्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्समार्फत स्पर्धेचे आयोजन

बोर्डी : चौथ्या राष्ट्रीय गलोल स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांनी पदकांची अक्षरश: लयलूट करीत पाच सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्य पदकांची कमाई केली. त्या मध्ये रूपेश पाटकर (२० मीटर), पिंटू भोनर (२५ मीटर), विजय गुहे (३० मीटर) अर्चना माढा (३० मीटर) यांनी गलोल स्पर्धेत सुवर्ण तर एयरगन प्रकारात पिंटू भोनर याने सुवर्णपदक पटकावले.मिनिस्टरी आॅफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट आॅफ इंडिया या मान्यता प्राप्त संस्थेकडून शिर्डी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोळा आणि एकोणीस वर्षीय तसेच खुल्या गटात स्पर्धा पार पडल्या. पालघर गलोल असोसियशन तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी त्या मध्ये सहभागी झाले होते.श्रीकांत सूक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या वांगर्जे चरीपाडा शाळेच्या रूपेश पाटकर याने (२० मीटर) सुवर्ण, पिंटू भोनर (२५ मीटर) सुवर्ण, विजय गुहे (३० मीटर)सुवर्ण आणि अर्चना माढा (३० मीटर) सुवर्ण रोहित माढा याने १५ मीटर प्रकारात रौप्य पदकांची कमाई केली.१६ वर्षाखालील मुलांच्या गटात २० मीटर अंतरावरून गोवणे शाळेच्या अजित ताम्बडा या विद्यार्थ्यांने दूसरा क्र मांक मिळवून रौप्य पदक पटकावले. तर याच गटात मुलींमध्ये अंजली मालकरीने रौप्य पदकाला गवसणी घातली.३० मीटर प्रकारात निर्जला मंडळला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यांना विजय पावबाके व दीपक साळवी यांचे मार्गदर्शन लाभले होते. अनिल वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० मीटर प्रकारात शिसने शाळेच्या शैलेश सोमण याने कास्य पदक पटकावले.शिवाय एयरगन प्रकारात पिंटू भोनर याने (२५ मीटर) सुवर्ण पदकावर निशाणा साधला. रोहित माढा याने (१० मीटर) कास्य, अमति माढा (१५ मीटर) कास्य, अरु ण काळे (२० मीटर) कास्य पदक पटकावले. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या स्पर्धेसाठी प्रवास खर्च आणि प्रवेश फी आरम्भ संस्था, रोटरी क्लब आॅफ बॉम्बे पियर, प्रारम्भ संस्था व रोटरी क्लब आॅफ ठाणे पैराडाइस, केआयएफसी मुंबई तसेच विक्र मगड येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी आर्थिक सहकार्य केले.अजय जाणार इटलीलाइटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गलोल स्पर्धेसाठी डहाणू तालुक्यातील अजय पागी या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. गत गतवर्षी त्याने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.इंटरनेटच्या माध्यमातून नेमबाजीतील खेळाडूंचे वीडियो प्राप्त करून ते स्पर्धकांना दाखवले. सरावा करीता या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला.-विजय पावबाके, मार्गदर्शक

टॅग्स :Sportsक्रीडा