जाधवच्या सुटकेसाठी डहाणूत स्वाक्षरी मोहीम
By Admin | Updated: April 20, 2017 23:56 IST2017-04-20T23:56:20+5:302017-04-20T23:56:20+5:30
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या निर्णायाचे पडसाद डहाणूत उमटले

जाधवच्या सुटकेसाठी डहाणूत स्वाक्षरी मोहीम
बोर्डी : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या निर्णायाचे पडसाद डहाणूत उमटले. बुधवारी सायंकाळी रेल्वे स्थानक ते सागर नाका दरम्यान निषेध मोचा काढून सहयांची मोहीम राबविण्यात आली.
महाराष्ट्राच्या सुपुत्राला सुनावलेली बेकायदेशीर शिक्षा रद्द करवून त्याला भारतात परत आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली. या करिता बुधवारी सायंकाळी डहाणू रोड रेल्वे स्थानक ते सागरनाका या दरम्यान पाकच्या निर्णयाच्या निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी सहभागी नागरिकांनी पाकिस्तान सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन फलक झळकावले. त्यानंतर सहयांची मोहीम राबविण्यात आली. त्याचे नेतृत्व मकरंद चणे, फिरोज पठाण, विजय सोनी, संतोष मोरे, रिवाज खान तसेच डहाणू सोशल ग्रुप यांनी केले. नागारिकांच्या या भावना पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती आदींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असे यावेळी आयोजकांतर्फे सांगण्यात आले. (वार्ताहर)