डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:12 AM2020-01-09T00:12:20+5:302020-01-09T00:12:28+5:30

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला.

dahanu of the Nationalist party So Shiv Sena's | डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

Next

अनिरुद्ध पाटील/शौकत शेख ।
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. शिवसेनेचा आलेख चढता तर भाजप आणि माकपला अपेक्षेप्रमाणे यश राखता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्हीही ठिकाणी खातेही उघडता न आल्याने ती भुईसपाट झाली. तालुक्यातील गटाच्या तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी $४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर २६ गणांसाठी राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपला २ जागेवर विजय मिळविता आला.
जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात यावेळी एका गटाची वाढ होऊन ही संख्या १३ झाली. मागील निवडणुकीत गटात १२ पैकी भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. महाआघाडीची ही खेळी राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लढवित असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत देत गटाच्या ४ आणि गणाच्या २६ पैकी सर्वाधिक ९ जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एक प्रकारे बिघाडी केल्याची प्रतिक्रिया या जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पकड यावेळीही ओसरताना दिसली. गतवेळेला त्यांच्या गटाच्या ५ जागा होत्या. आता गटात एकाने आणि गणात तीन जागांची घट झाली. काँग्रेसला पूर्वीसारखेच गटाकरिता एकच उमेदवार निवडता आला तर गणासाठी आताही खाते उघडता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्ही प्रकारात एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत गटातील २ आणि गणाच्या ४ जागा निवडून आणताना पंचायत समितीचे दुसऱ्या टर्मचे उपसभापती शैलेश करमोडा यांच्या रुपाने मिळवले होते. करमोडा यांनी जिल्हा परिषदेच्या ओसरविरा गटातून विजेतेपद मिळविले. माकपला अती आत्मविश्वास भोवताना दिसला. आमदारकी जिंकली असली तरी जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नसून पंचायत समितीच्या मागच्या वेळेप्रमाणेच २ जागा राखता आल्या.
दरम्यान, शिवसेनेचा चढता आलेख पहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांच्या नावावर नव्हती तर पंचायत समितीच्या २ जागा होत्या. यावेळी गटाच्या ३ आणि गणाच्या ८ जागा निवडून आणत दुसºया क्र मांकाचा पक्ष ठरला आहे. धामणगाव गटात सतीश सीताराम करबट हा एकमेव उमेदवार निवडून आला.

Web Title: dahanu of the Nationalist party So Shiv Sena's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.