सिलिंडरचा बाजार रस्त्यावर

By Admin | Updated: April 22, 2016 01:50 IST2016-04-22T01:50:06+5:302016-04-22T01:50:06+5:30

विरार शहरातील गॅस एजन्सींकडून सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सिलेंडरचा बाजार रस्त्यावरच मांडला आहे. गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडरची विक्रीही रस्त्यावरच होते आहे.

Cylinders market on the streets | सिलिंडरचा बाजार रस्त्यावर

सिलिंडरचा बाजार रस्त्यावर

विरार : विरार शहरातील गॅस एजन्सींकडून सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सिलेंडरचा बाजार रस्त्यावरच मांडला आहे. गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडरची विक्रीही रस्त्यावरच होते आहे.
गॅस सिलेंडर अतिशय ज्वलनशील आणि धोकादायक असतात. त्यांच्या साठ्याचा स्फोट झाल्यास प्रचंड जिवीत आणि वित्त हानी होऊ शकते. हे लक्षात घेऊन त्याचा साठा आणि विक्री करण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. मात्र विरार शहरात त्याचे उल्लंघन करून गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडरची थेट रस्त्यावरच विक्री केली जात आहे.
विरार पश्चिमेला विराटनगरातही मुख्य रस्त्यावर, भरवस्तीत गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक उभे करून तिथेच विक्री केली जात आहे. तर पूर्वेला रेल्वे क्रॉसिंगजवळ. साईनाथ नगर, मनवेलपाडा, चंदनसार आदी भागात भररस्त्यावर, भरवस्तीत गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक उभे करून सिलेंडर विकले जातात. घरोघरी जाऊन सिलेंडर देण्याऐवजी याठिकाणी सिलेंडरची विक्री करणे सोयीचे व फायद्याचे असल्याने गॅस एजन्सीने हा धोकादायक मार्ग अवलंबला असला तरी तो जनतेसाठी धोकादायक ठरणारा असल्याने याबाबत कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होेते आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cylinders market on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.