वर्तक महाविद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन
By Admin | Updated: October 31, 2015 22:29 IST2015-10-31T22:29:53+5:302015-10-31T22:29:53+5:30
पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांतर्फे वर्तक महाविद्यालय वसई येथे सायबर सुरक्षा मार्गदर्शन व गणेशोत्सव सजावट पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला

वर्तक महाविद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन
वसई : पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांतर्फे वर्तक महाविद्यालय वसई येथे सायबर सुरक्षा मार्गदर्शन व गणेशोत्सव सजावट पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कोकण विभागाचे पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुऱ्हाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सायबर सुरक्षा या विषयावर बोलताना निवृत्त सहा. पोलीस आयुक्त प्रफुल्ल जोशी म्हणाले, पैसे दामदुप्पट करून देतो अशा घोषणा जाहीर करणाऱ्या बोगस कंपन्या फेसबुक व इंटरनेटचा वापर करून सर्वसामान्य जनांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणाऱ्यांनी अशा गैरप्रकाराला बळी पडू नये असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ वकिल प्रशांत माळी यांनी सायबर गुन्हा कसा घडतो हे सांगताना इंटरनेट व फेसबुकच्या जाळ्यात मुले-मुली मैत्री करतात व अश्लील फोटोंचा वापर करून एकमेकांची बदनामी करतात त्यापासून लांब राहावे असे सांगितले. पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुराडे म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखाच्या घरात आहे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २७०० पोलीस आहेत त्यामुळे गुन्हे नियंत्रणात आणण्याकामी पोलीसांना अनेक दिव्यातून जावे लागते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे व विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.