कुडूसच्या आठवडेबाजाराकडे ग्राहकांची पाठ

By Admin | Updated: November 13, 2016 00:23 IST2016-11-13T00:23:42+5:302016-11-13T00:23:42+5:30

वाडा तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजार तालुक्यात प्रसिध्द असून त्यात लाखोची उलाढाल होत असते. मात्र ५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने बहुसंख्य नागरिकांनी या बाजाराकडे पाठ फिरविली होती.

Customers' lessons for the week of KUDISUS | कुडूसच्या आठवडेबाजाराकडे ग्राहकांची पाठ

कुडूसच्या आठवडेबाजाराकडे ग्राहकांची पाठ

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजार तालुक्यात प्रसिध्द असून त्यात लाखोची उलाढाल होत असते. मात्र ५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने बहुसंख्य नागरिकांनी या बाजाराकडे पाठ फिरविली होती.
कुडूस ही ५२ गाव पाड्यांची बाजारपेठ असल्याने शुक्रवारी दिवसभर येथे सामान खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिवाय कारखान्यांना शुक्रवारी सुट्टी असल्याने परप्रांतीय कामगारदेखील मोठया प्रमाणात येतात त्यामुळे या बाजारात लाखोंची उलाढाल होते. नाशिक, घोटी, इगतपुरी येथून भाजीपाला व्यापारी येतात त्यांनी खरेदी करून आणलेला माल विकत घ्यायला ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. किरकोळ विक्रेत्यांवर मात्र माल विकला न गेल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे येथील भाजी विक्रेते संजय पाटील यांनी सांगितले. या बाजारावर अवलंबून असणारे किराणा दुकानदार, मिनी डोअर, हातगाडीवाले, रिक्षा, नाभिक यांच्याकडे ग्राहक येत नसल्याने त्यांचा हा बाजार वाया गेला आहे.

Web Title: Customers' lessons for the week of KUDISUS