शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

पालघरमधील अद्भुत दगडी भिंतीबाबत कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:59 PM

भिंत निसर्गनिर्मित की मानवनिर्मित? : पुरातत्त्व खात्याचे मात्र दुर्लक्ष, सखोल अभ्यास करण्याची मागणी

- राहुल वाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : चीनची भिंत आपण ऐकली आहेच व ही भिंत बघण्याची सर्वांची इच्छादेखील असते. मात्र अशीच एक भिंत (बांध) पालघर जिल्ह्यातही असून दगडांची ही वैशिष्ट्यपूर्ण रांग अनेक ठिकाणी दृष्टीस पडते. ही भिंत मोठमोठ्या दगडांनी बनलेली आहे. कुतूहल निर्माण करणाऱ्या या अद्भुत भिंतीकडे पुरातत्त्व खात्याचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून या भिंतीबद्दल अभ्यास करून ही भिंत निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा शोध घेणे गरजेचे आहे.

विक्रमगड तालुक्यातील सातखोर, कावडास, आपटी, उपराळे, तलवाडा, डोल्हारी, खडकी, भोपोली, धारमपूर, कुर्नझे (तलवाडा) या गावांना तर वाडा तालुक्यातील मुंगुस्ते, आपटी, साई देवळी, घोडमाळ, असनस, गुंज, नांदणी, नंतर पुढे वज्रेश्वरीकडे ही भिंत गेली असल्याचे स्पष्ट दिसते. या शिला पूर्व-पश्चिम या अवस्थेत तुकड्यांमध्ये रचलेल्या दिसून येतात. या भिंतीला तेथील स्थानिक गावकरी भुईबांध व भीमबांध या नावाने संबोधतात. या भिंतीबाबत विविध दंतकथाही परिसरात सांगण्यात येतात. ‘अज्ञातवासात असताना पांडवांनी समुद्राला मिळणाºया सर्व नद्या अडवून एका रात्रीमध्ये पहाट होण्याआधी एक मोठा बांध बनवायला सुरुवात केली. पण हे त्यांच्या पत्नीला माहिती नव्हते. आपले पती काहीतरी काम करताहेत एवढेच तिला माहीत होते. त्यामुळे ती जेवणासाठी चटणी-भाकरी घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की आपले पती सर्व नद्या अडवायला लागले आहेत.

जर या सर्व नद्या अडवल्या तर संपूर्ण राज्य पाण्यामध्ये बुडेल व हाहा:कार माजेल, हे लक्षात आल्यावर या सर्वांना थांबवायचे कसे हा प्रश्न तिला पडला, तेव्हा तिला कल्पना सुचली व तिने कोंबड्याचे रूप धारण करून बांग दिली. बांग ऐकताच ते सर्व बांध तसाच अर्धवट ठेवून अज्ञातवासात निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या दुर्मिळ रहस्यमयी बाबीकडे शासकीय विभाग, इतिहासतज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञ, पुरातन विभाग या सर्वांनी या बांधाचा, भिंतीचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी निसर्गप्रेमी करीत आहेत.चीनच्या भिंतीप्रमाणे पालघर-ठाणे जिल्ह्यात देखील एक दगडांचा भिंतीप्रमाणे बांध आढळून येतो. या भिंतीबद्दल मोठे कुतूहल असून हा बांध निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा शोध घेणे गरजेचे असून शासनाने लक्ष देऊन या दगडी भिंतीचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला आदेश द्यावेत आणि या भिंतीचा अभ्यास करून या दगडी भिंतीचे रहस्य लोकांपर्यंत आणावे.- महेश कचरे, दगडी भिंत अभ्यासक व निसर्गप्रेमी