नाला बुजवणाऱ्या ठेकेदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:59 IST2018-12-12T22:59:20+5:302018-12-12T22:59:40+5:30
वसई विरार महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागात येणाऱ्या दिवणमान येथील सूर्यागार्डन परिसरातून जाणाऱ्या खाजण जमिनीच्या वसई, नायगाव खाडीत जाणारा नाला महापालिकेच्या ठेकेदाराने बाजूला असलेल्या जमीन मालकाची परवानगी न घेता त्यात प्रवेश करून व त्यातील शेकडो ब्रास माती काढून बुजविला.

नाला बुजवणाऱ्या ठेकेदारांना अटक
पारोळ : वसई विरार महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागात येणाऱ्या दिवणमान येथील सूर्यागार्डन परिसरातून जाणाऱ्या खाजण जमिनीच्या वसई, नायगाव खाडीत जाणारा नाला महापालिकेच्या ठेकेदाराने बाजूला असलेल्या जमीन मालकाची परवानगी न घेता त्यात प्रवेश करून व त्यातील शेकडो ब्रास माती काढून बुजविला. हा प्रकार जमीन मालकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला. या प्रकरणी संबधित ठेकेदारासह त्यांच्या दोन साथीदारांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला असून या प्रकरणात महापालिकेच्या संबंधित अधिकारीºयावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत तपास चालू असल्याचे पोलीस अधिकारी बेग यांनी सांगितले.
वसई तील मौजे दिवणमान सर्व्हे न ६२ या जागेचे मालक अमृत कडुलकर आणि इतर असून त्यातून जेसीबीद्वारे मातीचे उत्खनन करून नैसर्गिक व खाडीपात्रात जाणारा नाला बुजवित असल्याची माहिती मिळाली तेव्हा कडुलकरांनी ते काम थांबवून तेथे असलेलेल्या ठेकेदाराला जाब विचारला असता सुरू असलेले काम पालिकेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिसांसह महापालिकेच्या अधिकाºयांना बोलावून जाब विचारला असता तर आम्हाला खाडीवर रुंद पूल बांधण्याचा ठेका दिल्याचे त्यांनी सांगितले. तर या ठेकेदाराने शेतातून माती काढून नाला बुजवल्याचे निदर्शनास आणून दिले. जमीन मालकाने नोंदविलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी बालाजी कन्स्ट्रक्शन चा मुख्य ठेकेदार बबन मोहिते, जेसीबी चालक शिव निषाद व त्या कामाचा ठेकेदार सुनील नाईक यांना अटक केली.
हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून वसईला पुन्हा बुडावण्याचा डाव आहे या बाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कडे दाद मागू
- भूपेश कडुलकर, जमीन मालक