शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:08 IST

वसईतील सुरुची बाग येथील प्रकार; क्षमतेपेक्षा कोंबले जातात जास्त प्रवासी

वसई : येथील समुद्रकिनारी असलेल्या सुरुची बाग येथे पर्यटकांना रपेट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना क्रूर वागणूक देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका घोडागाडीत दहा प्रवासी बसवून रपेट घडविली जात आहे. वाळू माफियांनी केलेल्या वाळू चोरी मुळे हा किनारा पार खचून गेला आहे. तरीही पर्यटकांचा ओघ हा घटलेला नाही, याउलट तो दिवसागणिक वाढतोच आहे. मुख्य रस्त्यापासून किनाºयावर जाण्यासाठी ३ कि. मीटर चा तुटका रस्ता आहे.वाढत्या पर्यटनामुळे या रस्त्यावरून किनाºयावर जाण्यासाठी तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे येथे फक्त दुचाकी आणि घोडागाडी पर्यटकांना या सुरुची बाग किनाºयावर पोहोचविण्याचे काम करते. विशेष म्हणजे वसई सोडून इतर भागातून येणारे पर्यटक मजा म्हणून या घोडागाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे पाहता घोडागाडीचा चालक एका सवारीवर ९ ते १० पर्यटकांना एकाच वेळी बसवून प्रवास घडवित आहे. एकूणच या राबणाºया घोड्यांसाठी मात्र हा जीवघेणा प्रवास असून तो दररोज या किनाºयावर पहावयास मिळत आहे. रविवारी सायंकाळी १० पर्यटकांनी भरलेली घोडागाडी अचानक खाली कोसळली. जास्त वजन असल्याने या घोड्याला ते झेपले नाही आणि शेवटी ही गाडीच कोसळली.या अपघातात घोड्याच्या पायाला जबर दुखापत झाली तरी देखील या घोड्याला पुन्हा टांग्याला जुंपले गेले असल्याने प्राणीमित्रांत हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत घोडागाडी चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. तसेच हा घोडा दहा जणांचे वजन पेलवू शकतो म्हणून आम्ही जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु मुक्या घोड्यांवर राजरोस अत्याचार करणाºयावर मात्र कोणाचाही लगाम नसल्याची मोठी खंत व्यक्त होत आहे. याबाबत कुणाकडे आणि कशी तक्रार करावी असा प्रश्न येथील प्राणीमित्रांना पडला आहे. मालक घोड्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार