नाताळचे देखावे पाहण्यासाठी गर्दी
By Admin | Updated: December 29, 2015 00:07 IST2015-12-29T00:07:10+5:302015-12-29T00:07:10+5:30
विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर आधारित नाताळ देखावे पाहण्यासाठी वसईकर गर्दी करु लागले आहेत. गावागावात तरुणांनी चलतचित्र आणि रोषणाईच्या माध्यमातून

नाताळचे देखावे पाहण्यासाठी गर्दी
वसई : विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर आधारित नाताळ देखावे पाहण्यासाठी वसईकर गर्दी करु लागले आहेत. गावागावात तरुणांनी चलतचित्र आणि रोषणाईच्या माध्यमातून आकर्षक देखावे तयार केले आहेत. येत्या १ जानेवारीपर्यंत हे देखावे पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
वसईच्या पश्चिम पट्ट्यात प्रत्येक गावात आता विविध विषयांवर आधारित नाताळ देखावे तयार केले जात आहेत. येशू ख्रिस्ताचा जन्म, पर्यावरण, जेरुसलेम शहर, सांस्कृतिक आणि धार्मिक चालीरीती यांसह अनेक विषय घेऊन आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. सांडोर येथे वखारेवाडीत जेरुसलेम शहराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. चलतचित्राच्या माध्यमातून ख्रिस्त जन्माचे दर्शन घडवण्यात आले आहे.
नानभाट येथे तलावात पर्यावरण वर आधारित देखावा तयार करण्यात आला आहे. लाईट अंँड साऊंड शो हे येथील देखाव्याचे मुख्य आकर्षण आहे. नाताळ देखाव्यांची संख्या पाहता दरवर्षी अनेक पक्ष आणि संघटना नाताळ गोठे स्पर्धा आयोजित करीत असते. (प्रतिनिधी)