पालघरात गुन्हे वाढले
By Admin | Updated: December 28, 2015 02:08 IST2015-12-28T02:08:30+5:302015-12-28T02:08:30+5:30
नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला असल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारी दर्शवित असून गुन्ह्यांची उकल करण्याची जिल्हा पोलिसांची टक्केवारी ही ९७ टक्के आहे.

पालघरात गुन्हे वाढले
पालघर : नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला असल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारी दर्शवित असून गुन्ह्यांची उकल करण्याची जिल्हा पोलिसांची टक्केवारी ही ९७ टक्के आहे.
२०११ ते २०१४ अशा चार वर्षांची आणि २०१५ च्या मार्च पर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली तर खूनाचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच आहे. २०११ मध्ये ७९ खून झाले होते. १२ मध्ये ९४, १३ मध्ये ९१, १४ मध्ये ८५ असे प्रमाण होते. त्यांची उकल करण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यां दरम्यान होते. चालू वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात खूनाचे प्रमाण १९ होते. त्यातील १५ प्रकरणांचा तपास लागला आहे. खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही १२ झाले आहेत. दरवड्याच्या गुन्ह्यांत मात्र गेल्या चार वर्षांत वाढ झाली आहे. २०११ मध्ये १४१ असलेले दरोडे २०१४ मध्ये २०९ वर गेले होते. त्यांच्या उकलीचे सरासरी प्रमाण हे ३५ ते ८१ टक्क्यांच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे २०११ आणि १२ या वर्षात या परीसरात चेन स्नॅचिंगचा एकही गुन्हा नोंदविला गेला नव्हता. परंतु २०१३ मध्ये १४७ तर २०१४ मध्ये १२३ आणि २०१५ च्या प्रारंभीच्या तीन महिन्यात १६ असे त्यांचे प्रमाण होते. घरफोड्यांचे प्रमाण मात्र गेल्या चार वर्षांत वाढले आहे. २०११ मध्ये असलेल्या ६४८ घरफोड्या, चोऱ्या २०१२ मध्ये ७४६, २०१३ मध्ये ९३८, २०१४ मध्ये १०७१ व या वर्षाच्या तीन महिन्यात त्या २४८ झाल्यात. वाहनचोऱ्या मात्र सातत्याने वाढत आहेत. २०११ मध्ये अवघ्या २० असलेल्या वाहनचोऱ्या गतवर्षी ४५६ झाल्या तर या वर्षाच्या प्रारंभीच्या त्रैमासिकात १२० झाल्या दंगलीचे गुन्हे ही या चारही वर्षांत वाढतच गेले आहे. २०११ मध्ये १८०, २०१२ मध्ये २००, २०१३ मध्ये १८६, २०१४ मध्ये २१६ तर चालू वर्षाच्या त्रैमासिकात ५२ असे प्रमाण आहे. बलात्कारातही वाढ होत आहे. (प्रतिनिधी)