शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 21:53 IST

७ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

मंगेश कराळेनालासोपारा : वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दुकलीला अटक केली आहे. आरोपींकडून सात गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

वालीव पोलीस ठाणे हद्दिमध्ये घरफोडी व चोरी करणारे आरोपीत यांचा घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. सोनु रामसमुज निषाद (२२) आणि राहुल ननकी पोरटे (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीत यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सात गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेले दुचाकी, रोख रक्कम, चार चाकी वाहनांचे पार्ट, लॅपटॉप, मोबाईल, कंपनीतील पितळी ब्रास सामान, ऍल्युमिनियम व कॉईल पार्ट, घरातील होम थेअटर असा एकूण १ लाख ३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

वरील कामगिरी सुहास बावचे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - २ वसई, चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, बाळु कुटे, गजानन गरीबे, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खांडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी