शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या कारखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 23:33 IST

fire cracker : चंदनसार रोडवरील जुने पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या जैन व्हिला या इमारतीत हा बेकायदा कारखाना सुरू हाेता. पाेलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे आणि विरार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता छापा घातला.

नालासोपारा : विरार पूर्वेतील चंदनसार रोडवरील एका इमारतीत विनापरवाना आपटी बाॅम्ब फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर वसई गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी एकत्र छापा मारला. पोलिसांनी कारखान्यातून फटाके बनवण्याचे साहित्य, मशिनरी असा १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.चंदनसार रोडवरील जुने पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या जैन व्हिला या इमारतीत हा बेकायदा कारखाना सुरू हाेता. पाेलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे आणि विरार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता छापा घातला. आरोपी फय्याज मर्चंट (३२), राजकुमार पासवान (३२) आणि रामकुमार निशाद (२४) हे नियमांचे उल्लंघन हा कारखाना चालवत हाेते. या कारखान्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही या कारखान्यात ७८ कामगार काम करत असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी दोन आरोपींना ४१ ची नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणी दाेघांना ताब्यात घेऊन ४१ ची नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दहा लाखांचे साहित्य जप्तकारखान्यातून सात लाखांच्या सात मशीन, एक लाखाची फटाके पॅकिंगची मशीन, सहा हजार ६०० रुपयांचे ६५ रासायनिक द्रव्याचे पाच लिटरचे कॅन, १३ हजार ६८० रुपयांचे ३० लीटरचे रासायनिक द्रव्याचे २१ कॅन, एक लाखाचे ७० प्लास्टिक कागदाचे रोल, एक लाखाच्या ५८ मार्बल क्रॅशच्या गोण्या, ५० हजारांचे पार्टी पॉप तयार फटाक्यांचे लहान पिशव्यांचे २१ ट्रे असा एकूण १० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :fire crackerफटाके