शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

निग्रोच्या ३ अनधिकृत बारवर गुन्हे शाखेची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:12 IST

हजारो रुपयांच्या दारुसह ५ महिला आणि २ पुरुष निग्रोंसह एकूण ७ जणांना अटक

नालासोपारा : येथील पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील दोन इमारतीमधील ३ फ्लॅटमध्ये निग्रोंनी अनिधकृतपणे थाटलेल्या बारवर गुन्हे शाखेने धाड मारून हजारो रुपयांच्या दारुसह ५ महिला आणि २ पुरुष निग्रोंसह एकूण ७ जणांना अटक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.नूर आणि जय माता दि अपार्टमेंट मधील ३ रूममध्ये काही निग्रोनी अनिधकृतपणे बार थाटल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना खबऱ्याने बुधवारी दिली होती. यानंतर पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि वसई येथील गुन्हे शाखेच्या टीमने धाड टाकण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, राकेश साखरकर, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, विनायक म्हात्रे, रमेश नौकुडकर, दीपक राऊत, नरेश जनाठे, मुकेश तटकरे, रमेश अलदर, सागर बावरकर, प्रशांत पाटील, पी. व्ही. निकम, महिला पोलीस आणि आरसीपी प्लॅटूनसह बुधवारी छापा टाकला असता नूर अपार्टमेंट मधील रूम नंबर १०१ आणि २०१ मध्ये आलिशान अनधिकृत बार थाटला होता.त्याचप्रमाणे बाजूला असलेल्या जय माता दि अपार्टमेंच्या रूम नंबर १०१ मध्ये भल्या मोठ्या रूममध्ये अनिधकृत बार थाटल्याचे पोलिसांना आढळून आले. या दोन्ही टीमने घातलेल्या धाडीमध्ये आरोपी चर्सी जोसेफ आफिया (३७), किंगसी अमू कमरम (२८), एनानु ग्रीशा पीटर बाब्राह (३३), किंगस ओबीनो ओबीनाली (२६), रोझ फॉबोरोडे (२७), नाकोंडे इस्यर (२७) आणि नॉनयालूझी जस्टीन 25) या ७ स्त्री पुरु ष निग्रोना घटनास्थळावरून अटक केले आहे. ३ अनिधकृत बार मधून विविध कंपनीच्या बियर, व्हिस्की, वाईन असा एकूण दारूचा ५४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अंमली पदार्थ विक्रेत्याला नागरिकांकडून चोपपारोळ : नालासोपारा पूर्वे तुळींज येथील दक्ष नागरिकांनी पाळत ठेवून दोन अंमली पदार्थ विक्रेत्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. अंबावाडी भागात सर्रास अंमली पदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी होत्या.यावर पोलिस कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी स्वत: अंमली पदार्थ विक्रेत्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्यासाठी नागरिकांनी काही दिवस या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पाळत ठेवली. आणि गुरूवारी इंगा दाखविला. आज गुरूवारी यातील दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. यानंतर या दोघांना नागरिकांनी तुळींज पोलिसांच्या हवाली केले. सर्वसामान्यांच्या या उग्र भूमिकेचा अंमली पदार्थ विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.येथे नायजेरियन अनिधकृतपणे बार चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी धाडी मारून ७ निग्रोंना अटक करून ५४ हजारांची दारू जप्त केली आहे. तसेच या कारवाई दरम्यान ३० ते ३५ निग्रों पळून गेले असून त्यांचा शोध घेत आहे.- हितेंद्र विचारे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वसई युनिट