शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

‘मी वसईकर अभियान’ : आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:08 IST

‘मी वसईकर अभियान’ : पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढल्याचे प्रकरण

नालासोपारा : ११ कोटींच्या दफनभूमीच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया पोलिसांविरोधात शनिवारी संध्याकाळी पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढणाºया ‘मी वसईकर अभियाना’च्या ३५ ते ४० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही मिरवणूक काढून आदेशाचा अपमान करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.

‘मी वसईकर अभियाना’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात टाळ वाजत्रींच्या गजरात पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून ‘पालघर पोलीस जिंदाबाद’, ‘एसपी साहेब की जय हो’, ‘अ‍ॅडिशनल साहेब झिंदाबाद’, ‘डीवायएसपी माता की जय हो’, ‘कांबळे बाबा की जय हो, माणिकपूर पोलीस ठाणे की जय हो’ अशा घोषणा दिल्या होत्या.जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश दिलेला असतानाही तसेच पोलीस निरीक्षकांनी मिरवणूक काढू नका, असा लेखी आदेश देऊनही या आदेशाची अवज्ञा करून जमाव जमवत मिलिंद खानोलकर, अशोक वर्मा, किसनदेव गुप्ता, अनिल चव्हाण, सुमित डोंगरे, देवेंद्र कुमार, हेमंत मतावणकर, सिंग, रश्मी राव आणि इतर २५ ते ३० जणांनी शनिवारी संध्याकाळी वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका ते अंबाडी रोड-नवघर बस डेपो दरम्यान मिरवणूक काढली.घोटाळा नक्की कितीचा......सनसिटीमधील जमिनीवर दफनभूमीसाठी भरणी व संरक्षक भिंत बांधण्यासाठी महानगरपालिकेने साडे चार कोटीचे टेंडर काढले होते. त्यानुसार कंत्राटदाराने भरणी करून संरक्षक भिंत बांधली होती. पण हरित लवादाच्या आदेशानुसार ते बांधकाम पाडण्यात आले होते. कारवाई झाल्यामुळे साडे चार कोटींचे नुकसान झालेले असताना आंदोलनकर्त्यांकडून ११ कोटींचा चुराडा झाला असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. नेमका हा घोटाळा कितीचा झाला आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.जनतेच्या ११ कोटींचा झालेला अपव्यय यावर कसलीही करवाई न करता जनतेच्या हक्कासाठी लढणाºया आंदोलकांवर दबाव टाकण्याचे काम पालघर जिल्हा पोलिस करीत आहे. जोपर्यंत ११ कोटी खाणाºयांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे कितीही गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाही. -अनिल चव्हाण (वकील आणि आंदोलनकर्ते)नेमके काय आहे प्रकरणच्वसई पश्चिमेकडील सनसिटी परिसरात सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधताना ती जागा सीआरझेडमध्ये असल्याची स्पष्ट कल्पना महापालिकेतील सबंधितांना होती. कारण महानगरपालिकेकडे नगर रचना विभाग कार्यरत आहे. सीआरझेडबाबत योग्य परवानगी न घेतल्याने एनजीटीच्या आदेशाने ती स्मशान भूमी महापालिकेला तोडावी लागली होती. याव्यतिरिक्त अनेक तांत्रिक मुद्दे असल्याने महापालिकेने केलेली स्मशानभूमी वादग्रस्त व बेकायदेशीर ठरली.च्सर्वधर्मीय विशेषत: काही समाज बांधवांसाठी ती स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक होते. बांधलेली स्मशानभूमी तोडावी लागल्याने ती बांधण्यासाठी खर्च केलेले वसईकर करदात्यांचे ११ कोटी रुपये वाया गेले आहे. ते पैसे करदात्यांच्या कष्टाचे असल्याने ते वसूल करणे आवश्यक होते. त्या बांधकामाला मंजुरी देणारे संबंधित नगरसेवक, सल्ला देणारे नगररचना विभागाचे संबंधित अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा व संगनमत करून जनतेच्या पैशाच्या अपव्ययास जबाबदार असल्याने व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी मी वसईकर अभियानाअंतर्गत दोषींना पाठीशी घालणाºया पालघर पोलिसांच्या विरोधात गेल्या १६ जुलैपासून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर