भाजपच्या शहर उपाध्यक्षावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:01 IST2020-02-18T23:01:07+5:302020-02-18T23:01:36+5:30
विरारच्या सहकार नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक राजवीर सरणामसिंग ऊर्फ

भाजपच्या शहर उपाध्यक्षावर गुन्हा
नालासोपारा : विरार पूर्वेकडील सहकारनगर परिसरात बांधकाम केलेल्या इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेत तक्रारी अर्ज केला. त्यानंतर कारवाई टाळायची असेल तर बांधकाम व्यावसायिकाकडे दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाच्या विरार शहर उपाध्यक्षावर विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली आहे.
विरारच्या सहकार नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक राजवीर सरणामसिंग ऊर्फ गुड्डूसिंग (४२) याने गीता अपार्टमेंट नावाची इमारत बांधली आहे. जून २०१९ ते २७ जानेवारी २०२० च्या दरम्यान या इमारतीवर कारवाई करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे विरार शहर उपाध्यक्ष राजमन विश्वकर्मा याने तक्रार अर्ज केले होते. या इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी विश्वकर्मा याने राजवीर यांच्याकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये जीवदानी रोडवरील हिल पार्कमधील भोलेनाथ डेअरी अॅण्ड कोल्ड्रिंक्स या दुकानाच्या मालकांमार्फत घेतले व बाकी राहिलेल्या एक लाख रुपयांबाबत वारंवार बांधकाम व्यावसायिकाला फोनवर फोन केले.
कारवाईची धमकी
मागितलेल्या रकमेपैकी उरलेले एक लाख रु पये न दिल्यास ही इमारत महानगरपालिकेकडून पाडण्याची धमकी भाजप शहर उपाध्यक्ष विश्वकर्माने दिली. शेवटी विकासकाने कंटाळून विरार पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.