शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नगरसेवक वाढले, परंतु विकास मात्र मंदावला

By admin | Updated: October 26, 2015 01:21 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली. ८९ चे ११५ प्रभाग झाले, तर प्रभाग समित्या ५ च्या ९ झाल्या. परंतु, परिस्थितीत मात्र कोणताही बदल झाला नाही. साफसफाईची कामे वेळेवर होत नसल्यामुळे दुपारी दोन ते अडीचपर्यंत अनेक प्रभाग समित्यांच्या क्षेत्रात कचरा साचलेला दिसतो. साफसफाईच्या कामावर नियुक्त केलेले ठेकेदार ठरवून दिलेले कर्मचारी नेमत नसल्यामुळे साफसफाईची कामे पूर्वलक्षीप्रभावाने होत नाहीत. सदर बाब नवनिर्वाचित आयुक्त सतीश लोखंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. वसई-विरार उपप्रदेशात महानगरपालिका निर्माण होऊन ६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीमध्ये प्रामुख्याने रस्ते व गटारे इ. विकासकामे पार पडली. पाणी, आरोग्य, शिक्षण या तीन क्षेत्रांत मात्र भरीव विकासकामे होऊ शकली नाही. वाढत्या लोकसंख्येच्या या क्षेत्राला पूर्णअंशाने पाणीपुरवठा करण्याकरिता अतिरिक्त धरणाची गरज आहे. महानगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, परंतु सुसरी व देहर्जे या दोन्ही पाणीपुरवठा प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो.वसई-विरार शहर महानगरपालिकेला कर्मचारी भरतीकरिता शासनाच्या नगरविकास खात्याने पदमंजुरी दिली आहे. परंतु, अद्याप ही पदे भरण्यास सुरुवात झालेली नाही. महानगरपालिकेत काम करणारा ८५ टक्के कर्मचारी हा ठेक्यावरील कामगार आहे. कुशल व अकुशल कामगार अशी वर्गवारी न करता सरसकट भरती केल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होत असतो. शहर साफसफाईची कामे ठेकेदारांकडे सोपवण्यात आली आहेत. परंतु, हे ठेकेदार साफसफाईच्या कामावर ठरवून दिलेल्या संख्येने कामगार लावत नसल्यामुळे साफसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय कामकाजासाठी ठेक्यावरीलच कर्मचारी नियुक्त करण्यात आल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.