नगरसेवकांची नावे मतदारयादीतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:44 AM2018-12-21T05:44:22+5:302018-12-21T05:44:58+5:30

मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, भाग, घर क्र मांक, मोबाईल नंबर, इमेल नंबर, आदी महत्वपूर्ण माहिती आॅनलाइन अथवा आॅफ लाईन (कागद पत्रात) द्वारे निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवायची असते.

Corporators' names disappear from voters | नगरसेवकांची नावे मतदारयादीतून गायब

नगरसेवकांची नावे मतदारयादीतून गायब

Next

पालघर : येथील नगरपरिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या उमेदवारांसह अन्य आजी-माजी विद्यमान नगरसेवकांची नावेच मतदार यादीतून गायब करण्याचा प्रकार उघडकीस आला असून दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या पाशर््वभूमीवर या प्रकारची गंभीर दखल घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी तक्र ारदार नगरसेवकांनी केली आहे.

मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, भाग, घर क्र मांक, मोबाईल नंबर, इमेल नंबर, आदी महत्वपूर्ण माहिती आॅनलाइन अथवा आॅफ लाईन (कागद पत्रात) द्वारे निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवायची असते. त्याप्रमाणे पालघर मधील हजारो मतदारांनी पालघर तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक शाखा आणि संकेत स्थळावर नोंदवली गेली होती. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा बीएलओच्या मार्फत मतदारांच्या घरा-घरात जाऊन केल्या गेल्या नंतर संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केली जातात. पालघर मधील बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी राजेश त्रिपाठी यांनी पालघर तहसीलदार कार्यालयात माहितीच्या अधिकारात पालघर लोकसभा मतदार संघातील पालघर, बोईसर, डहाणू, विक्र मगड, नालासोपारा, वसई या विधानसभेतील मतदार संघामध्ये नोंदविण्यात आलेल्या नवीन मतदारांची नवीन नोंदणी, नावे वगळणे, स्थलांतरित यादी त्यांना लागणारे नियम याची माहिती मागविली होती. त्या माहितीत सहाही मतदार संघातील मतदारांची नावे समाविष्ट करताना कागदपत्रांची तपासणी, घरात राहतो की नाही आदी बाबीच्या खातरजमा बाबत बीएलओ कडून दक्षता बाळगण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी पालघर नगर परिषद निवडणुकी मधील अल्याळी वार्डातील सुमारे १५० मतदारांची नावेच गायब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नगर परिषदेच्या २०१४ च्या निवडणुकीत ही अल्याळी गावातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित मतदारांनी या बाबत तहसीलदारा कडे तक्र ारही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादीच्या विद्यमान नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता पाटील, नगर सेवक मकरंद पाटील, सेनेचे नगरसेवक जितेंद्र पामाळे, माजी नगरसेवक भावानंद संखे आदींची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका विशिष्ट पक्षाचे उमेदवार आणि मतदार वगळता अन्य बहुतांशी पक्षाच्या उमेदवारांची आणि मतदारांची नावेच गायब केली जात असल्याचे षडयंत्र सुरू असून जिल्हा निवडणूक विभागाने याचा शोध घेण्याची मागणी त्रिपाठी यांनी केली आहे. एका अज्ञात इसमाने आॅनलाइन अर्जाद्वारे माजी नगरसेवक भावानंद संखे याचे नाव कमी करण्याचा अर्ज केल्याचे समोर आले असून काही विशिष्ट लोका कडून राजकीय अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीने ‘सायबर क्र ाईम’ चा वापर केला जात असल्या आरोप होत आहे.

सदर तक्रारी बाबत शहानिशा करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत.
- डॉ.किरण महाजन, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग.

Web Title: Corporators' names disappear from voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.